औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद

0
10

गोंदिया दि. १५ इंटरनेट ई फार्मसीच्या माध्यमातून राज्यात व देशात बेकायदेशीर आॅनलाईन औषध विक्री सुरू असून या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवारी एक दिवसीय बंद पुकारला. त्यात गोंदिया जिल्हा औषध विक्रेता संघटनाही सहभागी झाली.
येथे औषध विक्रेत्यांनी बुधवारी दुपारी मागण्यांच्या पुर्ततेसाठी मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो औषध विक्रेते सहभागी झाले. औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळल्याने औषध मिळविण्यासाठी रुग्णांची चांगलीच दमछाक झाली. मात्र औषध विक्रेता संघटनेच्यावतीने आणीबाणीच्या प्रसंगी औषध उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली होती.