चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

0
9

चंद्रपूर, दि. १६ – सर्वोच्च न्यायालयाने चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्यास नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाचा निकाल १ डिसेंबरपर्यंत लावण्यात यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिले आहेत.

चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मोठ्या प्रयत्नानंतर चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. मात्र या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही सर्वोच्च न्यायालयाकडेही ही बदी उठवण्याची मागणी करण्यात आली. अखेर आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दारूबंदी हटवण्यास नकार देत उच्च न्यायालयाला याप्रकरणी १ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचा निर्देश दिले असून चंद्रपूरमध्ये दारूबंदी कायम राहणार आहे.