दुष्काळ घोषणेतून गोंदिया जिल्हा बाद,85 पैसे आणेवारी

0
15

मावा,तुडतुडा, सावरदेवीने शेतकNयांचे वंâबरडे मोडले : पैसेवारीची पद्धतच चुकीची असल्याचा आरोप

गोंदिया दि.१७: महाराष्ट्रातील सुमारे ४० हजार गावांपैकी तब्बल १४ हजार ७०८ गावांची पैसेवारी ५० टक्के पेक्षा कमी असल्याने या गावांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळ घोषणेत गोंदिया जिल्ह्याला मात्र, डच्चु मिळाला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.त्यातच गोदिया जिल्ह्याची आणेवारी 82 पैसे काढण्यात आल्याने दुष्काळी मदतीचा प्रश्नच राहिला नाही.त्यातच व्यापारी वर्गासाठी गोंदियात आलेल्या मुख्यमंत्र्यानीही शेतकयाना बोनसची अास बाळगू नका असा संदेश देत जखमेवर मीठ चोळले आहे.
जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात ७५ टक्केपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात मात्र, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. प्राप्त माहितीनुसार मागच्या वर्षी ७७ टक्के तर यावर्षी ८१ टक्के पाऊस पडला आहे. इंग्रज कालीन पारंपारीक पद्धतीने जिल्ह्यातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी काढण्यात आली. दरम्यान गोंदिया जिल्ह्याची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ०.८२ टक्के शासनाकडे पाठविण्यात आले. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करताना ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावातच दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील एकही गावात ५० टक्क्यापेक्षा कमी पैसेवारी नसल्याने दुष्काळाच्या घोषणेतून गोंदिया जिल्हा बाद झाला आहे. गोंदिया तालुक्यात ०.८७, गोरेगाव ०.८२, तिरोडा ०.८४, अर्जुनी मोरगाव ०.९३, देवरी ०.६७, आमगाव ०.७३, सालेकसा ०.८१ आणि सडक अर्जुनी तालुक्याची सरासरी पैसेवारी ०.८६ काढण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्याची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ०.८२ असल्याने दुष्काळ घोषणेतून गोंदिया जिल्हा पुर्णत: वंचित झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात निसर्गाने बळीराजाला दगा दिल्याने यावर्षी उत्पन्नाची टक्केवारी २० ते ३० टक्क्याने घसरली असल्याचे मत शेतकNयांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त गावातील शेतकNयांना दिलासा देण्यासाठी कृषी पंप विज बिलात ३३.०५ टक्क्याने सवलत जाहीर केली. विद्याथ्र्यांचे परीक्षा शुल्क माफ केले. शेतकNयांना जमिन महसुलात सुट दिली आहे. भरघोष उत्पन्नाच्या यादीत गोंदिया जिल्ह्याचे स्थान असल्याने जिल्ह्यातील शेतकNयांना मात्र, शासकीय मदतीविना पुन्हा आत्महत्येचा मार्ग स्विकारावा लागणार की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण गोंदिया जिल्हा दुष्काळ घोषणेतून बाद झाल्याने जिल्ह्यात धानपिकाचे भरघोष उत्पन्न होणार आहे, असाच अर्थ आणेवारीच्या माध्यमातून काढता येते.