पत्रकार विवेक गावंडे यांना मारहाण

0
10

विशेष प्रतिनिधी
यवतमाळ दि. १८-जिल्ह्यातील येळाबारा इथे राहणाऱ्या सुधीर डंबारे यांच्या पत्नीचा प्रसूती नंतर अचानक मृत्यू झाल्या प्रकरणी सुधीर डंबारे यांनी यवतमाळ येथील डॉ.सुरेखा बरलोटा यांच्यावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला होता.२५ वर्षाच्या वर्षा सुधीर डंबारे हिला काही दिवसापूर्वी मुलगी झाली होती. पण अचानक पणे पत्नी आणि मुलीची तब्यात खालावल्याने पत्नी चा मृत्यू झाला. यासंदर्भातील बातमी करण्यासाठी यवतमाळ येथील पत्रकार विवेक गावंडे गेले असताना त्यांच्या वर हॉस्पिटलच्या लोकांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. संबधित प्रकरणात पोलीस तपास करत आहेत.राज्यात जेव्हापासून युतीचे सरकार आले तेव्हापासून पत्रकारावरील हल्ल्यात सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.