शेंडा शासकीय आश्रमशाळेच्या 32 विद्यार्थ्यांना विषबाधा

0
17

सडक अर्जुनी दि. १८-तालुक्यातील शेंडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शोळेतील विद्याथ्र्यांना विषबाधा झाल्याची घटना आज १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शाळेतील एकूण ३२ विद्यार्थी बधीत झाले. सर्व विद्याथ्र्यांवर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान माहिती मिळताच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी ग्रामीण रुग्णालङ्मात जाऊन मुला मुलींची विचारपुस करीत योग्ङ्म उपचार करण्ङ्माचे निर्देश दिले.

राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्याच्या मतदारसंघातील आश्रमशाळेत हा प्रकार घडल्याने पुन्हा आश्रमशाळेतील प्रकार चव्हाट्यावर आला आहे.एकीकडे खासगी आश्रमशाळेतील विद्याथ्यारनाही मृत्यु कवटाळीत असताना आता शासकीय आश्रमशाळेचाही त्यात समावेश होऊ लागला आहे.

शेंडा येथे वर्ग १ ली ते १२ वी पर्यंतशासकीङ्म आश्रम शाळा आहे. तर त्याच ठिकाणी त्यांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान आज रविवार असल्याने सुट्टीचा दिवस होता. अशात दुपारी विद्याथ्र्यांना दुपारचे जेवण देण्यात आले. तर जेवण केल्यानंतर सर्वच विद्यार्थी स्वत:च्या खोलित जाऊन अभ्यास व आराम करित असताना अचानक ३२ विद्याथ्र्यांना उल्ट्या होऊ लागल्या दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शाळेतील शिक्षक व प्रबंधनाच्या अधिकाèयांनी बधीत विद्याथ्र्यांना शेंडा येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी ३२ पैकी किशोर राऊत (१७), योगराज भोयर (१५), निलेश नेताम (१३), मंगला ककोडे (१६), सिता भोयर (१२), ममता भोयर (१६), ज्योती धुर्वे (१३), पैर्णिमा भंडारी (१५), सीमा ईडपाचे (१६), निरूपा वट्टी (१५), सुनंदा मडावी (१८), सुनिता धुर्वे (१७) या बारा विद्याथ्र्यांची प्रकृती गंभीर व आरती नेताम (१६), किरण फुलसुंगे (१४), अनिता कोरेटी (१६), ज्योती पंधरे (१६) या चार विद्यार्थीनींची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान विषबाधेने बधीत झालेल्या सर्वच ३२ विद्याथ्र्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून बातमी लिहेपर्यंत ही विषबाधा कशामूळे झाली हे कळू शकले नाही.