वीज केंद्राचा धूर लोकवस्तीकडे

0
9

चंद्रपूर.दि.१९ :विस्तारित वीज निर्मिती केंद्रात आठव्या संचाचे ट्रायल आॅपरेशन सुरू आहे. या दरम्यान शनिवारी पहाटे ६ ते ७ च्या सुमारास धुरांड्यातून निघणारा काळाकुट्ट धूर वर अवकाशात न जाता थेट लोकवस्त्यांमध्ये शिरला. अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम करण्यात आलेल्या या संचाची अशीच अवस्था राहिल्यास येथील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा भीषण दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात सात संच आहेत. याशिवाय येथे ५०० मेगॉवॅटच्या दोन नव्या संचाचे बांधकाम सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. यांपैकी संच क्रमांक आठचे ट्रायल आॅपरेशन सुरू आहे.