भटक्या-विमुक्तांना क्रीमिलियर मधून मिळणार मुक्ति—-ना. राजकुमार बड़ोले

0
30

गोंदिया दि. १९ -भटक्या-विमुक्तांना क्रीमीलियरच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी सकारात्मक निर्णय लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बड़ोले यांनी दिले.
विदर्भ भोई समाज सेवा संघाच्या शिष्टमंडलाने दि. 18 ऑक्टोबर रोजी ना.बड़ोले यांच्या सड़क अर्जुनी येथील निवासस्थानी भेट घेऊन भटक्या-विमुक्तांना क्रीमिलियरमधून वेगळे करावे अशा आशयाचे एक निवेदन सादर केले असता मंत्री महोदयांनी शिष्टमंडलाशी आस्थेने चर्चा केली.
त्यांनी सांगितले की नॉन क्रीमिलियर संदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. त्यावर विधी व न्याय तसेच सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच याबाबत समाजातील सदस्य आणि विधीमंडल सदस्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन ना.राजकुमार बड़ोले
यांनी दिले. याप्रसंगी भोई(ढिवर्)समाजाचे डा.प्रकाश मालगावे, विदर्भ भोई समाज सेवा संघाचे नागपूर विभागीय अध्यक्ष टी.डी.मारबते . विभागीय सचिव अभियंता हरीश डायरे, संजय चाचिरे, शिवचरण दुधपचारे, सतीश मारबते आदि कार्यकर्ते उपस्थित होते.