पंचायत विभागातील कर्मचारी दरवडेच्या मृत्युला जबाबदार कोण?

0
19

गोंदिया,दि.१९- गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक पुरुषोत्तम दरवडेच्या मृत्युला घेऊन कूटुबिंयाच्यावतीने प्रशासनावर आरोप केले जाऊ लागल्याने दरवडेच्या मृ्त्युला खरा जबाबदार कोण अशा चर्चांना जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उधाण आले आहे.पंचायत विभागात वरिष्ठ सहाय्यक असलेल्या दरवडेचा १६ ऑक्टोबरच्या पहाटे दरम्यान अकास्मिक मृत्यू झाला.दरवडेला एप्रिल महिन्यात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्य्रकारी अधिकारी यांना कामचुकारपणाच्या कारणाखाली निलबिंत केले होते.तेव्हापासून सदर कर्मचारी हा मानसिक तणावाखाली होता.विशेष म्हणजे दरवडेचा कुठलीही चुक नसताना कामचुकारपणा दाखवून त्याला निलबिंत करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.पुरुषोत्तमला १ एप्रिल १५ ते २४ सप्टेंबर २०१५ पर्यंत निलंबित केले होते.त्याचे १ ऑक्टोबरला निलबंन परत घेऊन रिईस्टेट करण्यात आले होते. त्यानंतर सुत्रानुसार तो रुजु झाला त्यानंतर 15 आॅक्टोंबरला कुणा एका अधिकायाने त्यास भ्रमणध्वनी करुन निलबंन प्रकरणाबद्दल पुन्हा काहीतरी बोलल्याचे त्याच्या कूटुबिंयाचे म्हणणे असून त्या अधिकायाच्या फोन नंतरच पुरुषोत्तम अधिक तणावात आला आणि त्याचा मृत्यु झाल्याचे कुटुबातील सदस्यांचे म्हणने असून अधिकायानीच जीव घेतल्याचा आरोप करु लागले आहेत.या प्रकरणात काय सतत्या आहे याची शहनिशा होणे गरजेचे झाले आहे.