सीएम सुरक्षेच्या नावावर पोलिसांनी विमानतळावर अडवले आ.पुरामांचे वाहन

0
14

गोंदिया,दि.२१-जिल्हा तसा कागदोपत्रीच नक्षल जिल्हा राहिला.परंतु नक्षल जिल्ह्याच्या नावावर पोलिसांची जी दंडुकेशाही असते ती वेगळीच.परंतु जेव्हा केव्हा जिल्ह्यात मुख्यमंत्र्याचे आगमन होते तेव्हा त्यांना असलेल्या झेड प्लस सुरक्षेचे कारण देऊन पोलीस अधीक्षकांना आपल्या मनमर्जी कारभाराला संधी मिळते.एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्वतः प्रसिद्धिमाध्यमातून सांगत राहतात की माझ्यामुळे कुठल्याही सामान्य जनतेला सुरक्षेच्या कारणास्तव त्रास होता कामा नये.परंतु त्याच मुख्यमंत्री महोदयाचे आगमन एखाद्या ठिकाणी झाले की तेथील सामान्य जनतेसह लोकप्रतिनिधींनीही किती हेलपाटे सोसावे लागतात हे त्यांना कसे कळणार.अशाच प्रकार नुकताच म्हणजे १७ ऑक्टोंबरला घडला.मुख्यमंत्र्याचे गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर आगमन होणार होते.त्यासाठी नागपूरसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरही जेवढी सुरक्षा राहत नसेल qकवा सामान्य जनतेला विमानतळाच्या आतमध्ये जाण्यापासून थांबविले जात नाही.परंतु गोंदियाच्या बिरसी विमानतळावर नेहमीच सुरक्षेचे कारण देत विमानतळ प्राधिकरणासह पोलिसांची दंडुकेशाही काही नवी राहिली नाही.त्यादिवशी तर चक्क आमगाव- देवरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय पुराम यांना पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना यांच्या आदेशाच्या आधारावर प्रवेशद्वारावर हजर असलेल्या पोलीस कर्मचारी बैरय्यासह अन्य ४ ते ५ पोलिसांनी अडवून त्यांना विमानतळाकडे जाण्यासच मज्जाव केला.विशेष म्हणजे आमदार पुराम हे पोलिसांना आपण आमदार असल्याचे सांगत असतानाही ते एैकायला तयार नव्हते.त्यांच्यासोबतच भाजपच्या गोंदिया शहरातील काही पदाधिकाèयांची वाहने सुध्दा अडवून धरण्यात आली.२० ते २५ मिनिटे ह गोंधळ चालला.गोंधळ सुरू असतानाच भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचे वाहन आले.त्यांच्यासोबत नगराध्यक्ष कशीश जायस्वाल व शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय होते.त्यांनीही पोलिसांना ते आमदार असल्याचे समजविण्याचा प्रयत्न केला परंतु तो पोलीस मात्र एसपीचे आदेश असे सांगत एैकण्याच्या मनस्थितीत नव्हता.तेवढ्यातच तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांचेही वाहन आले.त्यांनीही वाहनातूनच हा प्रकार बघितला.शेवटी विनोद अग्रवाल व आदींच्या समजविल्यानंतर कुठे आमदार पुराम यांचे वाहन बाहेरील प्रवेशद्वारातून आत विमानतळाकडे जाण्यासाठी सोडण्यात आले.
आधीच अपमानीत असलेल्या आमदार संजय पुराम यांना विमानतळावर मुख्यमंत्री विमानातून उतरल्यानंतर आत येत असतानाही मुख्यमंत्र्याच्या सुरक्षा रक्षकांनी बाजूला सारल्याचे स्पष्ट चित्र बघावयास मिळत आहे.ज्या विमानतळावर मोजकेच आणि पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने आलेल्या १०-१५ लोकांमध्येही झेड सुरक्षेत मुख्यमंत्री वावरत असतील ते कितीही माझ्यासाठी सामान्य जनतेला त्रास देऊ नका सांगत असले तरी त्यांनाही आपल्या आजूबाजूला सुरक्षा घेरा कायम असावा असेच लागते,हे त्याचे द्योतक आहे.
या सर्व प्रकरणाने चिडलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व आमदार विजय रहागंडाले यांनी विमानतळावरील आरामकक्षात पोलीस अधीक्षकांची चांगलीच कानउघाडणी करीत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना पोलीस अधीक्षकांना जिल्ह्यातील आमदारांची ओळख नसल्याचे सांगत यापुढे असे खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले.आमदार संजय पुराम यांना बोालावून हे आमदार असल्याचे जनतेपासून दूर आपल्या वातानुकूलित कक्षात बसून राहणाèया पोलीस अधीक्षकाला सांगण्याची वेळ भाजपवर आली.या प्रकारानंतर तरी आमदार महोदय या अधिकाèयावर हक्कभंग आणणार की सोडणार याकडे लक्ष लागले आहे.
विमानतळ प्राधिकरण असो की पोलीस प्रशासनाने सुरक्षेचा आव अधिक आणणे सयुक्तिक नाही.पोलीस अधीक्षकांना सुरक्षेचा एवढाच आव आणायचा होता तर छेदीलाल इमलाह हत्याकांड ज्या दिवशी घडले त्या दिवशी आणि दुसèया दिवशी जे वातावरण शहरात तयार झाले त्यावर नियंत्रण का आणले नाही.खासदार पटोले दुसèया दिवशी आले नसते तर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असते.त्यानंतरही सालेकसा पोलीस ठाणेंतर्गत एका युवतीच्या आत्महत्येप्रकरणात त्यांच्याच पोलीस विभागाची संशयास्पद भूमिका असल्याचे समोर आले तरीही गप्प राहिले.गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाणे परिसरात दिवसाढवळ्या सट्टापट्टी आणि मटक्याचे अड्डे सुरू असताना त्यांचा पोलीस काय करतो.मांडोेदेवी सारख्या पवित्रस्थळाजवळ युवतीचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून येतो अशा घटनांवर अंकुश ठेवण्यापेक्षा मुख्यमंत्र्याच्या सुरक्षेचे कारण करून आपली पाठ थोपटून घेणारे पोलीस अधीक्षकांना लोकप्रतिनिधींची ओळख नसेल तर याशिवाय या सरकारचे आणि सत्ताधारी आमदारांचेही दुर्भाग्य म्हणण्याशिवाय काहीच करता येणार नाही.