महावितरण कार्यालयावर शिवसैनिकांची निदर्शने

0
8

भंडारा दि.२१-: वीज महावितरण कंपनी प्रशिक्षणार्थी असलेल्यांना मानधनात वाढ झाली असली तरी त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. याची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात महावितरण अधिक्षक अभियंता सतिश मेo्राम यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
महावितरणच्या अधिनस्थ प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली. मात्र त्यांना देण्यात येत असलेल्या मानधनात तफावत आहे. उर्वरित मानधन देवून महिन्याला देण्यात येणारे मानधन पुर्ण दयावी अशी मागणी त्यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना अनेकदा केली. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
याची माहिती प्रशिक्षणार्थ्यांनी भोंडेकर यांना निवेदनातून दिली. यावरुन भोंडेकर हे शिवसैनिकांसह महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता सतिश मेo्राम यांच्या कार्यालयात धडकले. यावेळी मेo्राम अनुपस्थित असल्याने उपकार्यकारी अभियंता गेडाम यांच्याशी चर्चाकरण्यात आली.
यावेळी ९ ऑक्टोंबरपासून मानधनात वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित मानधन येत्या काही दिवसातच देण्याची आश्‍वासन अधिकार्‍यानी या शिष्टमंडळाला दिले.