…तर चंदेरी दुनियेत वाजेल झाडीपट्टीचा डंका

0
14

गोंदियाची सुन अभिनेत्री तेजस्विनी पंडीत(बोपचे) यांचा विश्वास :
गोंदिया दि.२१: चित्रपट सृष्टीची चंदेरी दुनिया आजघडीला पश्चिम महाराष्ट्रातील गर्भ श्रीमंतांच्या हातात आहे. त्या भागात घराघरात कलावंत, घराघरात डायरेक्टर आहेत. यातुलनेत झाडीपट्टीदेखील कोणत्याही बाबतीत कमी नाही. झाडीपट्टी ही कलावंत निर्माण करणारी फॅक्टरी आहे. झाडीपट्टीने दर्जेदार कलावंत घडवीले. मात्र, पाश्र्वभूमिच्या अभावाने येथील स्थानिक कलावंत उपेक्षीत आहे. येथील कलावंतांना पाश्र्वभूमिबरोबरच पुढे जाण्याची उभारी मिळाली तर पुणे-मुंबईच्या चंदेरी दुनियेतही झाडीपट्टीचाच डंका वाजेल, असा विश्वास चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी पंडीत बोपचे (गोंदियाची सुन) हिने ‘बेरार टाईम्स’चे मुख्य संपादक खेमेंद्र कटरे यांच्याशी बोलताना व्यक्त केला आहे.
चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश करणे जेवढे कठीण आहे तेवढेच त्या क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवणे कठीण आहे. चित्रपट सृष्टीत हजारो कलावंत असल्याने कमालीची स्पर्धा आहे. मुंबईतल्या घराघरात कलावंत आणि घराघरात डायरेक्टर आहेत. या तुलनेत मात्र, झाडीपट्टीत प्रतिभावंत असुनही पाश्र्वभूमिच्या अभावाने कोळशातील हिरे अजूनही लपलेलेच आहेत. या लपलेल्या हिNयांना बाहेर काढून चंदेरी दुनियेत झाडीपट्टीचा डंका वाजावा अशी माझी इच्छा आहे. या दिशेने प्रयत्नही सुरू आहेत. असे विचार ‘मी सिंधुताई सपकाळ बोलतेय’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्वनी पंडीत हिने व्यक्त केले.
सोमवारला गोंदिया येथील पोवार बोर्डिंग येथे आयोजित पोवार युवा समितीच्या रास गरबा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या तेजश्विनीने पत्रकारांशी दिलखुलास चर्चा केली. दरम्यान चित्रपट सृष्टीतील अनेक पैलू पुढे आणले. तेजस्विनीचे लग्न गोंदियातील पोवार समाजातील बोपचे कुटुंबात झाले आहे. लग्नानंतर त्यांची सासरची ही पहिलीच भेट होती. गोंदियात येऊन आणि आपण ज्या समाजात सून म्हणून प्रवेश केला. त्या समाजाचे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात आपलाही सहभाग व्हावा आणि त्या दृष्ीने समाजाची ओळख व्हावी या करिताच रास गरबाच्या निमित्ताने गोंदियात आल्याचे तेजस्विनी म्हणाली. मी िंसधुताई सपकाळ बोलतेय या चित्रपटातून मी प्रवेश केला. त्या चित्रपटाने मला भरभरून दिलेले यश इतर चित्रपट मिळविण्यात मोलाचे ठरले. भविष्यात आपले अजून दोन चित्रपट येत असून काही मालिकांतूनही काम सुरू असल्याचे म्हणाल्या. झाडीपट्टीतील नाटकात आपल्याकडील कलावंत ज्या तळमळीने कला सादर करतात आणि लोकांना मोहून टाकतात. त्या कलावंतांना मुंबईच्या चित्रपट सृष्टीत संधी मिळायलाच पाहिजे. मुंबई-पुण्याचा कलावंत पूर्व विदर्भाच्या झाडीपट्टीत येऊन तेथील नाटकात काम करू शकतो. तर झाडीपट्टीतील कलावंतही बॉलिवुडात जाऊन आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन सादर करू शकते. यासाठी त्यांना हवी ती मदत. आपण आपल्या परीने जेवढे होऊ शकेल तेवढे करण्यास तयार आहे. झाडीपट्टीतील कलावंतांना त्या निमित्ताने भेटण्याची संधी ही मिळणार असल्याचा आनंद व्यक्त केला.