अपंग कल्याणकारी संघटनेने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
24

गोंदिया दि.२६: अपंग कल्याणकारी संघटनेच्यावतीने आज सोमवारला (दि.२६) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर अपंग संघटनेने विविध मागण्यांना घेऊन मोर्चा काढला.मोर्च्यात मोठ्या संख्येने अंपग सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर करुन शासनविरोधी घोषणा देत अंपगाचे निवेदन घेण्यासाठी व समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आपले प्रतिनिधी पाठवावे विचार आंदोलकानी व्यक्त केले होते.
अपंगांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत तीन हजार रूपये मदत द्यावी, अपंगांच्या एकूण संख्येनुसार नोकरीत सहा टक्के आरक्षण करावे, बेरोजगारांना बीज भांडवल योजनेंतर्गत ५0 टक्के अनुदानावर दोन लाखांचे कर्ज उत्पन्नाची अट न घालता द्यावे, स्पर्धा परिक्षेत अतिरीक्त अर्धा तास द्यावा, स्पर्धा परिक्षा शुल्क न आकारता केंद्रावर ये-जा करण्याचा खर्च द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.पोलीस निरीक्षक राजू सोनवाने यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.