जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध बांधवांचे धरणे आंदोलन

0
8

गोंदिया दि.२६: अखिल भारतीय आझाद बौद्ध धम्म सेना बिहारचे संस्थापक सेनानायक भंते बुद्धे शरण यांच्या नेतृत्वात अल्पसंख्यक भारतीय बौद्धांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी शनिवारपासून (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी गठित राजेंद्र सच्चर कमिटीसारखीच अल्पसंख्यक बौद्ध समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी अन्य उच्च समिती गठित करून संसदेला सोपविण्यात यावी. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील नवबौद्धांना आपल्या अल्पसंख्यांक आयोगामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये त्यांना हिंदू दर्शविले आहे. केंद्र शासनाने हिंदू न दर्शविता बौद्ध दर्शवावे व अल्पसंख्यक आयोगाच्या यादीमध्ये बौद्ध दर्शवून त्यांना आयोगानुसार सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यावे.
या मागण्यांसाठी उपोषण व धरणे आंदोलन सुरू असून जिल्ह्यातील संपूर्ण बुद्धिस्ट समाज संघाचा पाठिंबा आहे.
आंदोलनकर्त्यांमध्ये लॉर्ड बुद्धा मैत्री संघाचे जिल्हाध्यक्ष रतन वासनिक, डी.वाय. फुले, सेवक बन्सोड, एस.डी. राहुल, प्रभा गडपाल, पौर्णिमा रंगारी, कल्पना मेश्राम, प्रतिभा खोब्रागडे, रंजना भिमटे, मंगला मेश्राम, जिजन निकोशे, कला भालाधरे, मेहतरीन मडामे, मीरन मेश्राम, विद्या गणवीर, शोभा रामटेके, आशा रंगारी, दीपिका रंगारी, बोरकर तसेच इतर उपासक व उपासिका यांचा समावेश आहे.