सहकारी खरेदी विक्री समिती संचालकांची बिनविरोध निवड

0
9

गोरेगाव-दि.26-येथील गोरेगाव तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या संचालकांकरिता ८ नोव्हेंबरला निवडणुका होणार होत्या. नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी २३ ऑक्टोबर अखेरचा दिवस होता. या दिवशी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी समझोता करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.यात भाजपचे दोन संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक संचालक आणि काँग्रेसचे १४ संचालक राहतील असा निर्णय घेत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र खेमेंद्र कटरे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे स‹र्वासमोर निवडणुकीचा पेचप्रसंग उभा राहिला.त्यावर तोडगा म्हणून
बिनविरोध निवडणूक करण्यासाठी काँग्रेसच्या गोंदिया मुख्यालयातून आलेल्या यादीतील एका उमेदवाराचे अर्ज एैनवेळवर मागे घेतले गेले.
या निवडणुकीत काँग्रेससाठी अनेक वर्षापासून इमानेइतबारे काम करणाèया पक्षनिष्ठ व्यक्तीवंर काही नेत्यांनी निव्वळ आपल्या स्वार्थासाठी विरोध केल्याचा प्रकारही समोर आला.
विशेष म्हणजे खेमेंद्र कटरे यांच्या नावाला स्थानिक काँग्रेसच्या काही नेत्यांनी अखेरपर्यंत केलेला विरोध या निवडणुकीचे वैशिष्टय राहिले.
शेतकèयांच्या आधारभूत किमतीवर धान खरेदी करणारी सहकारी समिती असल्याने या समितीवर संचालकांसाठी सेवा सहकारी गट, इतर मागासवर्गीय गट, महिला राखीव गट, भटक्या विमुक्त जाती जमाती, विशेष मागास प्रवर्गातून १७ संचालक निवडावयाचे होते.
भारतीय जनता पक्षाने १७ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. तरीसुद्धा त्यांना दोन संचालकांवर समझोता करावा लागला हे विशेष. सेवा सहकारी संस्था गटातून खोमेश्वर रहांगडाले, शामराव हरिणखेडे, सर्वसाधारण गटातून खेमेंद्र कटरे, कुवरलाल कटरे, श्रीप्रकाश रहांगडाले, झामqसग बघेले, महेश चौधरी, मानिकचंद बिसेन, राजेंद्रqसग राठोड, डेमेंद्र रहांगडाले, जितेंद्र कटरे, खिरीचंद येळे, अनुसूचित जाती-जमाती गटातून विशाल शेंडे, इतर मागासवर्गीय गटातून परसराम कटरे, महिला राखीव गटातून जयवंता पटले, याचना काठेवार, भटक्या विमुक्त जाती गटातून लहू मेश्राम यांची संचालकपदी निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी माजी आमदार हेमंत पटले,खोमेश्वर रहांगडाले,जि.प.सभापती पी.जी.कटरे,माजी सभापती झामqसह बघेले,जिल्हा बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे एकत्रित आले होते.