पवार प्रगतिशील मंचच्यावतीने शनिवारला शरद पोर्णिमा उत्सवाचे आयोजन

0
4

गोंदिया,दि.२६-येथील पवार प्रगतिशील मंचच्या पवार नवयुवक समितीच्यावतीने शनिवार ३१ ऑक्टोबरला कन्हारटोली स्थित पवार सांस्कृतिक भवन येथे शरद पोर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सुरवात सकाळी १० वाजेपासून होणार असून रात्रीला गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभोज समितीचे माजी अध्यक्ष गुलाबचंद्र बोपचे राहणार आहेत.तर उदघाटन सेवानिवृत्त सरकारी वकील टी.टी.कटरे यांच्या हस्ते होणार आहे.मार्गदर्शक म्हणून सुभाष हायस्कूल डोंगरगावचे प्राचार्य टी.एस.कटरे,बक्षीस वितरण प्रगतिशील मंचचे अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पवार प्रगतिशील मंचचे अध्यक्ष डॉ.कैलासचंद्र हरिणखेडे राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य झेड.एम.पारधी,प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विरेंद्र कटरे,प्रगतिशील शेतकरी महेंद्र ठाकूर,बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे,मोरेश्वर रहागंडाले उपस्थित राहणार आहेत.यावेळी स्व.बी.एम.पटेल स्मृती पुरस्कार इयत्ता १० व १२ वी च्या गुणवंत विद्याथ्र्यांना ,स्व.रामचंद्र हरिणखेडे स्मृती पुरस्कार पीएमटीमध्ये गोंदिया शहरात समाजातून प्रथम आलेल्या विद्याथ्र्याला तसेच स्व.मुन्नालाल चौहान स्मृती पुरस्कार पीईटी परीक्षेकरिता देण्यात येणार आहे.७५ टक्के गुण मिळविणाèया गुणवंत विद्याथ्र्यांनी पवार प्रगतिशील मंचचे सचिव प्रा.डॉ.संजिव रहागंडाले यांच्याशी संपर्क करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
आयोजनासाठी पवार नवयुवक समितीचे अध्यक्ष पकंज पटले,सचिव छत्रपाल चौधरी,सोनू येळे,ईशान रहांगडाले,राज रहागंडाले,अंकित बिसेन,संदीप रहागंडाले,गुलाब ठाकूर,जयेश चौहान,संतोष बिसेन,शंशाक तुरकर,केतन तुरकर,जलज येळे,रिषभ कटरे यांच्यासह पवार प्रगतिशील मंचचे गोqवद येळे,राजू बोपचे,सुरेश पटले,गौरव तुरकर,लता रहागंडाले,योगेश ठाकरे,प्रा.किशोर भगत,सुरेश भक्तवर्ती,संदीप बघेले,सविता तुरकर,राजेश राणे,महिला समितीच्या अध्यक्ष मंजूषा हरिणखेडे,उपाध्यक्ष चेतना चौहान,सचिव स्वाती चौहान,सहसचिव रिता चौहान,कोषाध्यक्ष सोनाली रहांगडाले,लोकेश्वरी तुरकर,आरती तुरकर,रश्मी रहागंडाले,अंजली ठाकूर,चेतना भगत,ऊर्मीला पारधी,निता बोपचे,शास्त्रीवार्ड समितीचे झेड.पी.रहांगडाले,अजित टेंभरे,बी.डब्लू.कटरे,हेमराज रहागंडाले,रामकृष्ण गौतम,खुशाल कटरे आदी समिती सदस्य परिश्रम घेत आहेत.