केटीएस व बीजीडब्लू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे

0
9

गोंदिया,दि.29-गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील जनतेची आस असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पुर्ण होण्याच्या मागावर आहे.शासनाने गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुुरु करण्यासंबधीच्या हालचालींना वेग दिला असून महाविद्यालयाचे डीन रुजु झाले आहेत.सोबतच त्यांच्यासोबत 64 कर्मचारीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजुर झाला आहे.त्यापैकी 15 प्राध्यापकांची नियुक्ती सुध्दा झालेली आहे.इतर प्राध्यापकांसाठी जाहिरात सुध्दा गेल्या आठवड्यात महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात प्रकाशित झाली.आॅफिसीयल लागणारा कर्मचारी सुध्दा नेमला गेला आहे.त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय असलेले केटीएस रुग्णालय व महिला रुग्णालय असलेले बीजीडब्लू रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हस्तातरणांची जी प्रकिया करावी लागते.त्या प्रकियेला तसे आधीपासूनच सुरवात झाली होती.पंरतु मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार पाच दिवसात झालेल्या महत्वाच्या घडामोडी या आशादायक ठरल्या असून दोन्ही शासकीय रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे प्रमुखाकडे सोपविण्यात आले आहे.सोबतच सर्व इमारतीचे हस्तांतरण सुध्दा झालेले अाहे.शासनाने ठरविले तर आजच्या घडीला वर्ग सुरु होऊ शकतात एवढा प्रशासन तयार असल्याचे बोलले जाते.परंतु येथील एका नेत्याच्या अतिआत्मविश्वासीपणामुळे खर तर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी सुरु होऊ शकले नाही.ते पुढच्या वर्षी सुरु होणार असून यात त्या नेत्याचे काहीही योगदान राहणार नसले तरी आपली पाठ थोपाटण्यासाठी नक्कीच ते लोकप्रतिनिधी काम करणार आहे.