कार्यालयात हयगय खपवून घेणार नाही- अतिरिक्त परिवहन आयुक्त

0
3

गोंदिया,दि1:ज्या ऑटोरिक्षांचे परवाने रद्द, व्यपगत झाले आहेत, असे परवाने १६ नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करण्यास शासनाने मुदतवाढदिली आहे. या योजनेचा ऑटोरिक्षा चालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाचे अतिरिक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना असे सांगितले.तसेच गोंदियाच्या परिवहन विभागातील कर्मचारी यांच्याजागेवर बसून काम करणार्या अशासकीय लोकांना त्वरीत हटविण्याचे निर्देश दिले.गेल्या तीन चार वर्षापासून रिक्त असलेल्या पदाकडे शासनाचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रभारी परिवहन अधिकारी निमजे यांनी अडचणी सांगितल्या.
परवाने नूतनीकरणाबाबत ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र परिवहनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑक्टोबर रोजी आढावा बैठक पार पडली असता, बर्‍याच ऑटोरिक्षा परवानाधारकांनी नुतनीकरण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने १६ ऑक्टोबरपर्यंत ऑटोरिक्षाचा परवाना नूतनीकरणास मुदतवाढदिली आहे. या कालावधीत परवाने नूतनीकरण न केल्यास ते कायमचे रद्द केल्या जातील. परिवहन विभागाच्या वतीने राज्यभर ३0 ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
यात दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाईकेली जाईल, असा इशाराही दिला.
पत्रकार चर्चा करीत असतांना तेथील एका परिवहन निरिक्षकांने मध्येच महिला कर्मचारी यांना रात्र झाल्याने घरी जायचे आहे,तुम्ही उठा असे सांगताच परिवहन आयुक्त चांगलेच भडकले मात्र निमजे गप्प राहीले यावरुन परिवहन निरिक्षक हे निमजे यांच्यावर इतर दिवशी सुध्दा कशाप्रकारे आपला रुबाब दाखवित असतील याचा प्रत्यय परिवहन आयुक्तांच्या समोर बघावयास मिळाले.