शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष खपवून घेणार नाही-खा.पटोले

0
13

गोंदिया,दि.1-गोंदिया शहर हे जिल्ह्याचे महत्वाचे ठिकाण असून राजकीयदृ्ष्ठयाच नव्हे तर व्यापारीकदृष्टा महत्वाचे आहे.ज्याप्रमाणे शहरातील स्वच्छतेकडे नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाने लक्ष द्यावयास पाहिजे तसे होतांना दिसून येत नाही.उलट आंदोलनाचा इशारा देत आंदोलन करुन शहराला अस्वच्छ करण्याकडेच अधिक लक्ष दिसून येत असल्याचे सांगत यापुढे स्वच्छतेविषयी कुठलीही तड़जोड केली जाणार नाही.दिवाळीच्या काळात कुणीही आंदोलन करणार नाही,ज्या काही मागण्या आहेत.त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच पगारही वेळेवर कसा मिळेल याकडे नगरप्रशासन लक्ष देईल असे सागंत खासदार नाना पटोले यांनी गोंदिया नगरपालिकेच्या स्थायी व अस्थायी स्वच्छता कमर्चारी यांना गोंदिया शहराला स्वच्छ शहर करण्याचे आवाहन केले.यापुर्वीच्या स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यानेच शहराची ही दुरावस्था झाली त्यातच काही कर्मचारी आपल्या स्वार्थासाठी आंदोलनात्मक भूमिका घेऊन शहरातील जनतेला वेठीस धरतात हे चुकीचे आहे.यापुढे शहराच्या स्वच्छतेकडे दुल्रक्ष करणारा सफाई कामगार असो की त्या वार्डातील अधिकारी यावर कठोर प्रशासनात्मक कारवाईचे धोरण राबविण्याचे निर्देश मुख्याधिकारी यांना दिले.ते गोंदियात आले असता शनिवारी नगरपालिकेचे नगराध्यक्ष कशीश जायस्वाल यांच्या कक्षात आयोजित बैठकीत बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष कशीश जायस्वाल,मुख्याधिकारी वाहुरवाघ,नगरसेवक शिव शर्मा,घनश्याम पानतवने,बंटी पंचबुध्दे,अभय अग्रवाल,सफाई कामगार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी भरत क्षत्रिय,सुनिल केलनका,कुशल अग्रवाल आदी उपस्थित होते.