पालकमंत्री सावंत आज जिल्ह्यात

0
8

भंडारा दि.५ : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दिपक सावंत हे आज  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नियोजन भवनाचा कोनशिला समारंभास उपस्थित राहतील. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात येणार आहे. यावेळी सावकारी कर्जमाफी, मंगळसूत्र वापसी कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहतील