पीआरसीने निलबिंत केलेल्या शिक्षकाची शाळेतच आत्महत्या

0
11

अमरावती,दि.7 – जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पंचायत राज समितीने जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचा आढावा घेतला.या अंतगर्त ज्या कामात व विभागात त्रु़ट्या आढळून आल्या त्या विभागातील कर्मचारी यांना निलबिंत करण्याचे आदेश सोडले.त्यातच सेमाडोह जिल्हा परिषद शाळेत 30 किलो तांदूळ कमी आढळल्याने समितीचे सदस्य हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी चौकशी व भेटीदरम्यान मु्ख्याधापक नकाशे यांना कुटुंबासह तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती.त्यानंतर धास्तावलेल्या विजय नकाशे यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. जिल्हा परिषद सदस्य सुधीर सुर्यवंशी व नागरिकासंह शिक्षकांनी जोपर्यंत वरिष्ट अधिकारी शाळेत येत नाही व धमकी देणायावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह न उचलण्याची भूमिका घेतल्याने प्रशासन चांगलेच धास्तावले आहे.