पोलिसांना बांधले रक्षणाचे रेशीमबंध

0
34

तिरोडा : देशातील अंतर्गत सुरक्षा पोलीस गस्तीवर असतात. ते आपल्या कुटुंबाची पर्वा न करता लोकसेवा करतात. कोणत्याही प्रकारचे सण-उत्सव साजरे न करता, कुटुंबातील मुले, पत्नी, आईवडील यांची सोबत न करता 24 तास आपले लोकसेवेचे कर्तव्य बजावतात. ही बाब जाणून महिलांनी दवनीवाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांना रक्षणाचे रेशीमबंध बांधले. दरम्यान एका महिला पोलीस शिपायाचे स्थानांतर झाल्यामुळे निरोप समारंभही घेण्यात आला.

याप्रसंगी दवनीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते पंचायत समिती सदस्य गुडू लिल्हारे यांच्या उपस्थितीत दवनीवाडाचे पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ व गंगाझरीचे पोलीस निरीक्षक दहेकर, सर्व पोलीस शिपाई, महिला शिपाई व कर्मचारी यांना महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्षणाचे रेशीमबंध बांधले. यातून भाऊ-बहीण एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

Farewell ceremony
महिला शिपाई आशा खोब्रागडे यांचा सत्कार करताना उपस्थित सामाजिक महिला कार्यकर्ते

दवनीवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला शिपाई आशा खोब्रागडे यांचे स्थानांतर रामनगर पोलीस ठाण्यात झाले. त्याबद्दल त्यांना शाल, श्रीफळ व रक्षणाचे रेशीमबंध बांधून निरोप देण्यात आला. तसेच पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सुनिता लिल्हारे, पार्वती लिल्हारे, सुनिता पंढेले, कांता सूर्यवंशी, सरस्वती सूर्यवंशी, समिता बिरनवार, गिरजा मानकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन बांधले. संचालन धनेश्वर पिपरेवार यांनी केले. आभार नन्हा डोहळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.