ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन मागे

0
128

गोंदिया,दि.31ः- गोंदिया जिल्ह्यात ग्रामसेवक संघटनेच्यावतीने सुरु करण्यात आलेले असहकार आंदोलन नागरिकांची गैरसोय लक्षात घेत तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या विनंतीमुळे मागे घेण्यात आल्याचे पत्रक संघटनेच्यावतीने आज काढण्यात आले आहे.यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली करण्याची मुख्य मागणी मंजूर झाल्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.जिल्ह्यातील ग्रामसेवक आपल्या न्याय मागण्या करिता लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी झाले होते. २६ न्याय मागण्या संबंधाने जिल्हा प्रशासनाद्वारे सगळे मुद्दे निकाली काढण्याचे आश्वाषण लेखी देण्यात येवूनही यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता मागण्या एकही निकाली न निघता केवळ आश्वासन पुरते मर्यादित राहिल्याने दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन लोकशाही मार्गाने सुरु करण्यात आले होते.मात्र आजपर्यंत कोणत्याही मागण्या पूर्ण झाले नसल्यामुळे आंदोलन टप्पा तीन नुसार संपूर्ण जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या चाबी व शिक्के उद्या १ सप्टेंबरला सर्व पंचायत समिती गट विकास अधिकारीना सोपविणार होते. मात्र या कालवधीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली संदर्भाने आदेश निघाल्याने व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.)यांनी सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे म्हटले आहे.