एस.एस. गर्ल्स कॉलेज | रासेयोतर्फे पोषण आहार कार्यक्रम

0
17

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित स्थानिक एस.एस. गर्ल्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पोषण आहार जनजागृती आणि उद्बोधन कार्यक्रम छोटा गोंदियाच्या नगरपरिषद शाळेमध्ये घेण्यात आला. तसेच ग्रामीण परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली.

अध्यक्षस्थानी केटीएस रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर होत्या. या वेळी बी.जे.डब्ल्यू. गोंदिया येथील आहार तज्ञ स्वाती बनसोड, आरोग्य पर्यवेक्षक पंकज गजभिये, आरोग्य कर्मचारी आशीष बले, स्टाफनर्स पानतावणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक आणि कोविड नोडल अधिकारी भारत सरकार प्रा.डॉ.कविता राजाभोज यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजना तसेच पोषण आहार याबद्दल माहिती देत पाहुण्यांचा परिचय दिला.

या वेळी स्वाती बनसोड यांनी आहार आणि पोषण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती केली. डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी आपल्या भाषणातून पोषण आहाराची आज गरज कशी व किती आहे, हे समजून त्यासंबंधी जनजागृती करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

संचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ.कविता राजाभोज यांनी केले. कार्यक्रमात एस.एस. गर्ल्स कॉलेज आणि डी.बी. सायन्स कॉलेज गोंदिया येथील विद्यार्थिनींसह नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमानंतर छोटा गोंदिया विभागात रॅली काढण्यात आली. विविध पोस्टर्सच्या माध्यमातून पोषण आहार याबाबत माहिती देण्यात आली.