मद्यधुंद पोस्टमास्तर ग्राहकाला भिडला

0
48

अर्जुनी मोरगाव : प्रशासनातील कर्मचारी अभ्यंगताशी उद्धटपणे वागणे हे काही नवीन नाही, पण चक्क पोस्टमास्तरच त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांशी मारामारी करत असेल तर? पोस्टमास्तरने चक्क मद्यधुंद अवस्थेत ग्राहकाशी फ्री स्टाईल हाणामारी   केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून सोशल मीडियावर व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या टपाल कार्यालयातील पोस्टमास्तर श्री सयाम हे कार्यालयात थांबत नसून नेहमीच मद्यपान करुन येत असल्याची तक्रार होती.तर कार्यालयात असून सुद्धा ग्राहकांची कामे करत नाहीत, अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात होत्या.आता त्यांचा मद्यधुंद अवस्थेत फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्राहकाशी कुठल्यातरी कारणावरुन वाद झाल्यानंतर सयाम थेट मारामारीवर उतरले. त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :