कामगार कल्याण केंद्रामार्फत नेत्ररोग निदान व उपचार शिबीर संपन्न

0
27

गोंदिया,दि.10 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र गोंदिया येथे कामगार व
कामगारांच्या कुटूं‍बियांकरीता 8 सप्टेंबर रोजी नेत्ररोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड होते. यावेळी शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.सुप्रिया सुटे, डॉ.गजानन कोंडावार, डॉ.आकाश मोटवानी, डॉ.सुभम टेंभरे, कामगार
कल्याण अधिकारी कांचन वाणी व नागरी सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव सुनिल पारधी उपस्थित
होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना श्री राठोड यांनी जागतिक युनिसेफ ऑर्गनायझेशन व कामगार
कल्याण मंडळाच्या संयुक्त वतीने कोविड-19 काळात रोजगार गमावलेल्या कामगार व कामगारांच्या कुटूंबियांना
विविध उद्योगाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असे जाहिर केले. सदर कार्यक्रमात 75
कामगार व कामगारांच्या कुटूंबियांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कामगार कल्याण केंद्राचे संचालक ताम्रदिप जांभूळकर यांनी केले तर उपस्थितांचे
आभार छाया मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम कांबळे, प्रकाश मेश्राम, ताराचंद नागरीकर,
जावेद शेख, तृप्ती जांभुळकर, अजयसिंह चंदेल व कोमल बडवाईक यांनी सहकार्य केले.