बटाना येथील तंटामुक्त समितीची आढावा बैठक उत्साहात

0
39

अनेक विषयांवर झाली चर्चा

गोंदिया(ता.15)–मागच्या दिड वर्षांपासून कोव्हिडं च्या कारणाने गावात कोणतीही सभा झाली नव्हती. परंतु आता कोव्हिडं चा प्रभाव कमी झाल्याने तालुक्यातील बटाना येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची सभा बुधवारी (ता.15)येथील ग्रामपंचायत भवनात उत्साहात पार पडली.
सभेची सुरुवात ग्रामसेवक ठाकरे यांनी सादर केलेल्या प्रास्ताविके नुसार करण्यात आली. सभेत गावात कोणतेही साथीचे रोग पसरू नये म्हणून गावकऱ्यांनी आपापल्या परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आव्हान करण्यात आले. तसेच येणाऱ्या दिवसात गावात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी सर्वांनी एकमताने होकार दिला. या व्यतिरिक्त डासांची उत्पत्ति होऊ नये म्हणून नागरिकांनी घरातील डबक्यात,भांड्यात, कुंड्यात पाणी साचून ठेवू नये असे आव्हानही यावेळी करण्यात आले.यावेळी गावात सुरू असलेल्या मोफत नळ जोडणीत गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपआपल्या घरी नळ जोडणी अवस्य करून घ्यावे असे आवाहनही करण्यात आले. लसीकरणात मोहिमेत गावकऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे अशी विनंती हि करण्यात आली. या व्यतिरिक्त लहान मुलांचे येणाऱ्या संभाव्य कोव्हिडं पासून संरक्षण कसे करावे यासंबंधी हि माहिती देण्यात आली. महिला व खास करून मुलींचे आरोग्य तपासणी व अंगणवाडी व शाळेला पुरविण्यात येणाऱ्या वस्तू संदर्भातही चर्चा करण्यात आली. या बैठकीला सरपंच विजय कुसराम, उपसरपंच दिपक साठवणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तोमेन्द्र हरिणखेडे, धर्मराज रहांगडाले,करन येडे,कुंडलिक फुलबांधे,भुवन वटी, खुर्मराज वाघाडे, सतीश बिसेन, उमेश बागडे, विजू लांजेवार, तसेच गावकरी व समितीचे सदस्य उपस्थित होते .सभेचे संचालन ग्रामसेवक ठाकरे यांनी केले तर आभार भुमेश्वर येडे यांनी मानले.