किंडगीपारचा प्रवासी निवारा धोकादायक

0
31

आमगाव-येथून गेलेल्या राज्य मार्गावरील किंडगीपार येथील प्रवासी निवारा जिर्णावस्थेत आहे. तो केव्हा कोसळून दुर्घटना होईल याचा नेम नाही. या प्रवासी निवार्‍याला निर्लेखीत करून नविन प्रवासी निवारा बांधावा, अशी मागणी जिल्हा कांग्रेस कमेटीचे सचिव इसुलाल भालेकर यांनी केली आहे.

स्थानिक विकास निधीअंतर्गत 25 वर्षापूर्वी परिसरातील प्रवाश्यांच्या सोयीसाठी गोंदिया-आमगाव-डोंगरगढ आंतरराज्यीय मार्गावर किंडगीपार येथे प्रवासी निवार्‍याचे बांधकाम करण्यात आले. किंडगीपार रेल्वे गेट, आयटीआय जवळ प्रवासी निवारा असल्याने येथून विद्यार्थी, प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात.

सध्या या निवार्‍याच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्याने निवार्‍याची दुरवस्था झाली आहे. भिंतीला तडे जावून भेगा पडल्या आहेत. हा निवारा केव्हा कोसळून दुर्घटना होईल याचा नेम नाही. संभाव्य धोका टाळण्यासाठी आ. सहेषराम कोरोटे, नगर परिषदेचे प्रशासक डी. एस. भोयर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी लक्ष देऊन किंडगीपार येथील प्रवासी निवारा निर्लखीत करून नविन प्रवासी निवारा बांधावा, अशी मागणी भालेकर यांनी निवेदनाद्वारे केलली आहे.