सेवानिवृत्त व आदर्श ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकार्यांचा मुकाअ यांच्या सत्कार

0
72

गोंदिया,दि.20ः- सेवानिवृत्त व आदर्श ग्रामसेवक /ग्राम विकास अधिकारी यांचा सत्कार येथील मयूर लॉन कटंगी येथे आयोजित ग्रामसेवक युनियनच्या वार्षिक अधिवेशन व ग्रामसेवक पतसंस्था आमसभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी ल अनिल पाटील म्हणाले की, ग्रामसेवक संवर्गाला शासनाच्या विविध योजना अमलबजावणी करतांना घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर मार्गदर्शन करतांना काम करणार्‍यांच्या बाजूने मी नेहमी उभा आहे. मात्र कामचुकारपणा करणार्यांची गय केली जाणार नसल्याचे बजावत युनियन सोबत चर्चेच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडविल्याचे आश्वासन वार्षिक अधिवेशनात दिले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील होते.सदर कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत राजकुमार पुराम,गटविकास अधिकारी दिलीप खोटेले,ग्रामसेवक संघटनेचे मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण व जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून करण्यात आली.तद्नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख पाहुणे यांचे हस्ते सेवानिवृत्त ग्राम सेवक ग्राम विकास अधिकारी यांचे शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.सेवानिवृत्त सत्कारमुर्तीमध्ये जे. टी. पारधी,एम. ए. रहिले,बनकर, ब्राह्मणकर,संग्रामे,शरणागत,मस्करे,नागलवाडे,एच. बी. माहुले,अरविंद नागदेवे,डी. के. बड़ोले, के. ए.लिल्हारे,बी.एम. चांदेवार,बी.एम.हटवार,पि.एम.गौतम, आर.एम.पटले, एस.एम.भेलावे, एस.जे.पटले,एफ.के.सोनवणे यांचा समावेश होता.
त्यानंतर सन 2015-16 ते 2019-20 मध्ये आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड झालेले ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांचेही प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.त्यात आदर्श ग्रामसेवक 2015-16 या वर्षाकरीता वेदमुर्ती एम. साकुरे गोंदिया,अरुण डी हातझाडे स.अर्जुनी,संतोष एम कुटे सालेकसा,कु.रेखा डब्ल्यू.ठाकरे गोरेगाव,सी.आर.चाचेरे आमगाव,योगेंद्र कटरे देवरी.आदर्श ग्रामसेवक 2016-17  किशोर ए.आचले सालेकसा,विलास गोबाड़े स.अर्जुनी,ओ.के.रहांगडाले तिरोड़ा,गायककुमार ठाकुर गोंदिया,रविन्द्र एस राठोड.आदर्श ग्रामसेवक 2017-18 शिवानंद एम गौतम गोंदिया,धर्मेंद्र बी पारधी स.अर्जुनी,योगराज एच बिसेन सालेकसा,सुरेंद्र एस.निघोट तिरोड़ा,कौशल्या सी कोंबडीबुरे आमगाव,रविन्द्र बी.अंबादे देवरी,प्रभाकर बी.गिरीपुंजे.आदर्श ग्रामसेवक.. 2018-19 संजय जी कडव देवरी,पद्माकर एस हूकरे मो.अर्जुनी,सरिता बी माहुले गोरेगाव,दयानंद जी फटिंग गोंदिया,रितेश के शहारे आमगाव,भागेश के चव्हाण स.अर्जुनी,पि.बी.कावळे सालेकसा,आदर्श ग्रामसेवक 2019-20 यू.एस.मानापुरे देवरी,डब्ल्यू एस.पोटावी मो.अर्जुनी,कु.संजू एस शहारे गोरेगाव,हंसराज एच.गजभिये गोंदिया,रामेश्वर आर.जमईवार आमगाव,संदीप एस मेंढे स.अर्जुनी,मोहपत एम.नागपुरे सालेकसा यांचा समावेश आहे.
आमसभा व वार्षिक अधिवेशनाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी केले.त्यामध्ये ग्रामसेवक संवर्ग अतिशय विपरित परिस्थितिमध्ये करीत असलेले कार्य येणार्‍या समस्या व प्रशासनाकडे प्रलंबित मागण्याकडे प्रशासनाने सहानुभूतीपुर्वक विचार करुन सहकार्य करावे आम्ही सर्व लोकोपयोगी योजनांच्या अमलबजावंणीची ग्वाही देतो असे सांगितले.यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी  राजकुमार पुराम यांनी ग्रामसेवक संवर्गाच्या कोरोंना कालावधीत केलेल्या कार्याची दखल घेत कौतुक करीत प्रलंबित समस्या लवकरच निकाली काढण्याचे सुतोवाच केले.सदर कार्यक्रमाचे संचालन रामा जमाईवार यांनी तर आभार दयानंद फटिंग व लक्ष्मण ठाकरे यांनी मानले.ग्रामसेवक सहकारी पतसंस्था गोंदिया जिल्हा र. न. 116 च्या सर्वसाधारण आमसभेत अध्यक्ष कमलेश बिसेन यांनी कर्ज मर्यादा दोन लाख वरून पाच लक्ष करण्याचे व इतर उपविधी दुरुस्ती करण्याचे विविध महत्वपूर्ण प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे जाहिर केले.