पंतप्रधान आवास योजेने अंतर्गत तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा समावेश करा-आ. विजय रहांगडाले

0
20

तिरोडा,दि.20:- पंतप्रधान आवास योजेनेअंतर्गत गरजू लोकांना निवासाकरिता आवास योजेनेचा लाभ मिळण्याबाकरिता पंत प्रधान आवास योजना केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असून याद्वारे लाभार्थ्यांचे सर्वे करून सुरुवातीला प्रपत्र ड यादीमध्ये नावे समाविष्ट करण्यात येतात. व त्या यादीला ग्रामसभेत मंजूर करून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येते. परंतु सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात अशा पात्र लाभार्थ्यांचे नावे पाठविण्यात आली. परंतु सर्वेनुसार तांत्रिक चुकीमुळे बहुतांश लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन प्रकाशित झालेल्या यादीमध्ये दिसत नसल्याने कित्येक गावात पाठविलेल्या संखेच्या फक्त १ टक्के नावच आहेत. जसे कि तिरोडा तालुक्यात डोंगरगाव ख.येथे २८७ लाभार्थ्यांची नावे पाठविण्यात आली. परंतु यापैकी २ लाभार्थ्याचे नावे पात्र यादीत असून उर्वरित २८५ अपात्र ठरलेले आहेत. तसेच गोरेगाव तालुक्यातील गनखैरा गावात ५१२ पैकी ७ लाभार्थ्याची नावे समाविष्ठ आहेत. हा प्रकार जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात असून याकरिता ऑनलाइन करतेवेळी संबधीत तांत्रिक कर्मचारी यांच्या चुकीमुळे लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आलेली असल्यामुळे लाभार्थ्याच्या मनात प्रचंड प्रमाणात गावस्तरावर रोष व्यक्त केला जात असल्यामुळे सरपंच अडचणीत आले. याची दखल घेत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी सदर बाब मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्या निदर्शनास आणून दिली. असे ऑनलाइन यादीमध्ये अपात्र दर्शवित असलेल्या लाभार्थ्याची यादीचे प्रशासनाच्या देखरेखीमध्ये ग्रामसभेमध्ये वाचन करून त्यांना पुनः पात्र करण्यात येवून लाभ देण्यात यावे जेणेकरुन गरजूंना आवास योजनेचा लाभ मिळेल याकरिता प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना आदेश देवून सदर प्रकरण तत्काळ मार्गी लावण्याबाबत पत्र दिले आहे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी येत्या आठ दिवसात सदर विषय मार्गी लावण्याबाबत कळविले आहे.