खरेदी विक्री समितीच्या सभापती बघेले तर उपसभापती राठोड

0
11

गोरेगाव,दि.२३,- येथील तालुका शेतकी खरेदी विक्री समितीच्या सभापती डॉ झामqसग बघेले व उपसभापतिपदी राजेंद्रqसह राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संदीप बुरले यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात संचालकांची सभा घेतली. यात सभापतीसाठी डॉ.झामqसग बघेले व उपसभापतिपदासाठी राजेंद्रqसग राठोड यांनी नामनिर्देश भरले. त्यांच्या विरोधात अर्ज आले नाही. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी संदीप बुरले यांनी सभापतिपदी डॉ.झामqसग बघेले व उपसभापतिपदी राजेंद्रqसग राठोड यांची निवड झाल्याचे जाहीर केले. संचालकामध्ये परसराम कटरे, डेमेंद्र रहांगडाले, खेमेंद्र कटरे, महेश चौधरी, श्रीप्रकाश रहांगडाले, खोमेश्वर रहांगडाले, कुवरलाल कटरे, विशाल शेंडे, माणिक बिसेन, जितेंद्र कटरे, शामराव हरिणखेडे, लहु मेश्राम, खिरीचंद येळे, सयवंताबाई पटले, याचना कोठेवार यांचा समावेश आहे. डॉ.बघेले यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय संचालकासोबतच काँगेस नेते आमदार गोपालदास अग्रवाल यांना दिले आहे.निवडणुकीनंतर अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण,नवनिर्वाचित नगरसेवक डॉ.रुस्तम येळे, कृऊबा सभापती मलेश्याम येरोला,माजी जि.प.सदस्य जगदिश येरोला,फाये,संजय भगत,शसेंद्र भगत,महाप्रकाश बिजेवार,भुमेश्वर पटले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.