जि.प.च्या वरिष्ठ लिपिकाला २० हजारांची लाच घेताना अटक 

0
11

 

गोंदिया : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वरिष्ठ लिपिकाला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि.२६) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात केली. घनश्याम पलटूराम यादव (४०) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
 तक्रारदार सेवानिवृत्त वनपाल आहेत. शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नीचे जुन्या शाळेतून कार्यमुक्तीच्या आदेशाची फाईल शिक्षणाधिकाNयांकडे दाखल करण्याकरिता वरिष्ठ लिपीक घनश्याम यादव याने तक्रारदाराला २५ हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु, तडजोडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले. ही रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार सेवानिवृत्त वनपाल यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून विभागाच्या पथकाने सापळा रचला. दरम्यान, सेवानिवृत्त वनपालाकडून २० हजार रुपये स्विकारताना यादवला रंगेहात अटक केली. आरोपी यादवविरूद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे यांच्यासह प्रमोद घोंगे, प्रमोद चौधरी, राजेश शेंद्रे, योगेश शेंद्रे, योगेश उईके, शेखर खोब्रागडे, रंजीत बिसेन, डिगांबर जाधव, वंदना बिसेन, देवानंद मारबते यांनी केली.