भाजपतर्फे संविधान दिन साजरा

0
9

– आंबेडकर चौक व पालकमंत्री कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन
गोंदिया, दि.२६  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याकरीता लिहिलेली स्वतंत्र राज्य घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाचे संविधान अर्पण केले होते. हे दिवस संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशात पाळण्यात येते. भारतीय जनता पक्षातर्फे २६ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात व पालकमंत्री कार्यालयात जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. दरम्यान, सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी देशातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य समानता प्राप्त करून देणाèया संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. तद्नंतर पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, दिपक कदम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी, जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला, जिल्हा उपाध्यक्ष महेश आहुजा, प्रदिपqसह ठाकूर, चतुर्भुज बिसेन, शहर महामंत्री संजय मुरकुटे, धनंजय वैद्य, अशोक चन्ने, अशोक जयqसघानीया, पंकज सोनवाने, मोहसिन खान, मिताराम हरडे, अनिल नागपुरे, सतीश मेश्राम, मुकेश हलमारे, छोटू रामटेककर, दिलीप पिल्ले, अजित मेश्राम, मंगलेश गिरी, रामकिशन दमाहे, सोमेश्वर गौतम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. तसेच पालकमंत्री कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.