शासनात विलीन करण्यासाठी मजीप्राचे अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर

0
51

गोंदिया, गोरेगाव, तिरोड्यातील पाणीपुरवठा ठप्प

गोंदिया,दि.७ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शासनात विलीन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी प्राधिकरणच्या अधिकारी, कर्मचाèयांनी सोमवारपासून (दि. ७) बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे गोंदिया, गोरेगाव व तिरोडा येथील पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. याची झळ जवळपास दोन लाख नागरिकांना सोसावी लागणार असून, पाण्यासाठी उन्हाळ्यासारखीच पुन्हा भटकंतीची वेळ त्यांच्यावर आली आहे.
घटना दुरुस्तीच्या नावावर राज्य शासनाने जीवन प्राधिकरणाकडे असलेली पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रमुख कामे जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेकडे (नगरपालिका) हस्तांतरित केली आहेत. त्यामुळे पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करीत असलेली सर्व कामे शासनाने काढून टाकली. परिणामी प्राधिकरणाला उत्पन्नाचे कोणतेही स्रोत उरले नाही. कर्मचाèयांना वेतन, सेवानिवृत्तिवेतन, महागाई भत्ता, आर्थिक लाभ वेळेवर मिळत नाही. केवळ प्राधिकरण चालवीत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपट्टी वसुलीतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपले खाते चालवीत आहे. याबाबत प्राधिकरणाच्या विविध संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीची जाणीव सरकारला करून दिली. मात्र, सरकारने दुर्लक्ष करीत प्राधिकरणाच्या खच्चीकरणाचेच काम केले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाèयांचे भविष्य अंधकारमय होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, शासनाचे लक्ष वेधून रास्त असलेली मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या नेतृत्वात अधिकारी, कर्मचाèयांनी बेमुदत संप पुकारला. या संपामुळे गोंदिया शहरातील जवळपास सव्वालाख, गोरेगाव येथील ५० हजार तर तिरोडा येथील जवळपास २५ हजार लोकांना होणारा पाणीपुरवठा ठप्प पडला आहे.
त्यामुळे या भागातील जनजीवन प्रभावित झाले असून, पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे.प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचाèयांनी कार्यालयासमोर तंबू ताणून शासनाचा निषेध केला आहे. या आंदोलनात कार्यकारी अभियंता चंद्रीकापुरे, उपकार्यकारी अभियंता इंगोले, शाखा अभियंता ठोंबरे, खैरे, खापेकर,संजय कटरे,मडके,मारबते,शर्मा,पापुलवार,बागडे,त्रिवेदी,बीजेवार,वाघाये,पटले,अरखेल,बीसने, दिवाळे, वानखेडे, भडके,राऊतकर,आठवले,सोनवाने,फेंडारकर, पटले,सोयाम,तनखीवाले,qझगरे,चौडलवरार,तुरकर,पीपरे,सैय्यद,मेश्राम,अरखेल,आठवले,कोहाड,खोरगडे,पंधराम,वघारे,उके,परतेती,चोले,यांच्यासह जीवन प्राधिकरणाचे सर्व कर्मचारी सहभागी झाले.
जिल्हाधिकारी, पोलिस मुख्यालयालाही फटका
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचाèयांनी पुकारलेल्या संपाचा जिल्हाधिकारी आणि पोलीस मुख्यालयालाही फटका बसला आहे. जिल्ह्यात महत्त्वाची कार्यालये असलेल्या या दोन्ही कार्यालयातील पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने अधिकारी, कर्मचारीच नव्हे तर, कामानिमित्त कार्यालयात येणाèया जनतेला मोठी कसरत करावी लागत आहे.