पं.स. च्या कनिष्ठ सहाय्यकाला लाच घेताना अटक

0
9

अर्जुनी ‘मोरगाव-दि.७ : -येथील पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकाला ३ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी भंडाराच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
श्यामराव मन्साराम समरीत (वय ४१) असे या लाचखोर कनिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे.
यातील तक्रारदाराची आई ही सेवानिवृत्त शिक्षिका आहे. सेवानिवृत्तीनंतर मेडिकल बील व जीपीएङ्कचे धनादेश काढून देण्याकरिता कनिष्ठ सहाय्यक श्यामराव समरीत याने तक्रारदाराला ३ हजार रुपयांची मागणी केली. परंतु, ही रक्क‘ देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने भंडाराच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून विभागाच्या पथकाने सोमवारी पंचायत समितीत सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ३ हजार रुपये स्वीकारताना पथकाने कनिष्ठ सहाय्यक स‘रीत याला रंगेहात अटक केली.