खèया आदिवासींना न्याय द्या

0
15

नागपूर दि-८: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मूळनिवासी आदिवासी हक्क संघर्ष महासंघाच्या नेतृत्वात हजारो आदिवासींनी विधानभवनावर धडक दिली. या मोच्र्याचे नेतृत्व राजे वासुदेव टेकाम,आमदार राजू तोडसाम,आमदार संजय पुराम, अँड. पद्माकर वळवी यांच्यासह आदींनी केले. खèया आदिवासींना न्याय द्या, बिरसा मुंडा जिंदाबाद अशा घोषणा देत हजारो आदिवासींनी आपले शक्तिप्रदर्शन केले. हा महामोर्चा मॉरिस कॉलेज टी-पॉईंट येथे धडकला. दरम्यान, आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी मोर्चास्थळी भेट देऊन मोर्चार्कयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु मोर्चेर्कयांनी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू केल्यामुळे त्यांना लगेच मोर्चास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. यानंतर सायंकाळी विविध लोकप्रतिनिधींसह आमदार बच्चू कडू व आमदार रेड्डी यांनीही मोर्चास्थळी भेट देऊन मोर्चेर्कयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु मोर्चेर्कयांनी मुख्यमंत्री आल्याशिवाय हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. अशाप्रकारे रात्री उशिरापर्यंत सर्व मोर्चेकरी ठाण मांडून बसले होते.