स्वाइन फ्ल्यूचे सात रूग्ण आढळले

0
9

गोंदिया दि.११: स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांवर गोंदिया शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर रूग्णालयात या आजाराचे अधिकतर रूग्ण उपचारासाठी पोहोचत असल्यामुळेच ही बाब बोलली जात आहे. विशेष म्हणजे अधिकतर रूग्ण जवळील बालाघाट जिल्ह्याचे रहिवासी आहेत किंवा त्यांचे संबंध कोणत्या ना कोणत्या तर्‍हेने बालाघाट जिल्ह्याशी आहेत.
ज्या रूग्णांना मागील दोन महिन्यांत स्वाइन फ्ल्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, त्यात बालाघाट जिल्ह्यातील उकवा येथील रहिवासी रूपलता भोयर (४८), बालाघाट येथील रहिवासी शशिकला लिल्हारे (४२), गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील रहिवासी शांता रहांगडाले (६0), बेलाटी (कवलेवाडा) येथील रहिवासी वंदना वंजारी, आमगाव येथील रहिवासी अमित जांभूळकर (३0), आमगाव तालुक्यातीलच कातुर्ली येथील रहिवासी किरण प्रकाश भलावी (८) व सालेकसा तालुक्यातील खोलगड येथील रहिवासी फागलाल गौतम (५0) यांचा समावेश आहे. या सर्व रूग्णांच्या नमुण्यांची तपासणी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत झाली व त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांना सदर आजाराने बाधित झाल्याचे सांगण्यात आले आहे.