आदिवासींनी हक्कासाठी लढावे-पुराम

0
8

चिचगड दि.११: जल, जंगल आणि जमिनीवर खरा हक्क आदिवासींचा असून ते जोपासण्याचे काम आम्ही केले. इंग्रजांनी यावर हक्क दाखवू नये, असे इंग्रजांना बजावून सांगत लढा देणार्‍या क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना खरा अपेक्षित आदिवासी समाजाची एकत्र येवून हक्कासाठी लढा द्यावा, असे आवाहानात्मक प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. येथील बिरसा मुंडा मैदानावर रविवारी आयोजित समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार रामरतन राऊत होते. ध्वजारोहण भरत दुधनाग यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अलताफ हमीद, अँड. मनिराम मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य मिना राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रल्हाद भोयर, आदीवासी सेवक प्रभाकर कोल्हारे, डॉ. राहूल बागडे वनविकासचे वनक्षेत्राधिकारी ढवळे, प्राचार्य जनार्धन कोल्हे, रतिराम मरस्कोल्हे, चेतन उईके, लोकनाथ तितराम, मधुकर दिहारी, लोकेश ताराम, इंदल अरकरा, उपसरपंच ललीत भैसारे, ठाणेदार तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
बिरसामुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पमाला घालून पूजन करण्यात आले. संचालन युवराज कोल्हारे यांनी केले. आभार धनराज धानगाये यांनी मानले. कार्यक्रमासाठी संदीप गावळ, जयेंद्र राऊत, तुलशी सलामे यांनी सहकार्य केले.