देवरीच्या सभापती मुख्यमंत्र्यांना भेटल्या

0
9

13 व्या वित्तआयोगाप्रमाणे पंचायत समितीला निधी देण्याची विनंती

 

देवरी (ता.11)- 14 व्या वित्त आयोगाप्रमाणे विकासनिधी हा थेट ग्रामपंचायतीला वळता करण्यात आला. त्यामुळे पंचायत समितीचे महत्व कमी झाले आहे. जिल्हा परिषद क्षेत्र वा पंचायत समिती क्षेत्राच्या विकासात पंचायत समितीचेही तेवढेच महत्त्व आहे. परिणामी, 13 वित्त आय़ोगाप्रमाणे निधी पंचायत समितालाच देण्यात यावा, या आशयाचे निवेदन देवरी पंचायत समितीच्या सभापती देवकी मरई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

13 व्या वित्त आय़ोगात ग्रामीण भागातील विकास कामांचा निधी हा पंचायत समिती स्तरावर येत होता. त्यामुळे पंचायत समितीलासुद्धा महत्त्व प्राप्त होते. परंतु,  आता 14 वा वित्त आयोग लागू झाला असून ग्रामीण भागातील विकास निधी हा थेट ग्राम पंचायतीच्या खात्यावर वळता केला जात आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर हे अन्यायकारक असल्याचे मत पंचायत समिती सदस्यांचे झाले असल्याचे सांगण्यात येते. यावर तोडगी काढण्यासाठी देवरीच्या सभापती यांनी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट आमदार संजय पुराम यांनी घडवून आणली. या शिष्टमंडळात सुनंदा बहेकार,मेहतर कोराम, गणेश तोपे, गणेश सोनबोईर आणि नरेंद्र मेश्राम यांचा समावेश होता.