सेवानिवृत्तीच्या उबंरठ्यावरील अधिकाèयाना पालकमंत्र्याचे आमत्रंण

0
8

गोंदिया,दि .१६ -गेल्या १५वर्षानंतर जिल्ह्याला स्वजिल्ह्याचा पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्याचे चांगले भले होईल या आशेने बघणाèया जिल्हावासियांच्या स्वप्नांचा चुराडा होऊ लागला आहे.गेल्या १५ वर्ष बाहेरचे पालकमंत्री असताना त्यांच्या काळात कधीही सेवानिवृत्तीच्या उबंरठ्यावरील अधिकारी गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले नाही.परंतु राज्याचे सामाजिक न्याय व सहाय्यमंत्री तसेच पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात जे अधिकारी येऊ लागले त्याकडे बघितल्यास मुख्यमंत्र्याकडेच नव्हे तर प्रशासनात जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचा वचक नसल्यानेच सेवानिवृत्तीला वर्ष दीड वर्ष असलेले अधिकाèयांना गोंदिया जिल्ह्यात पाठवून रिक्त पदाचा बॅकलाग पूर्ण करण्याचा सपाटा भाजपसेना सरकारने सुरू केला आहे.विशेष म्हणजे सामाजिक न्याय विभाग ज्यांच्या हाताखाली त्यांच्या जिल्ह्यातील उपायुक्त समाजकल्याण अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीचे पद वर्षभरापासून रिक्त पडले आहे.ती पदे भरण्यात पालकमंत्र्यांना स्पष्टपणे अपयश आल्याचे दिसून येते.सोबतच जिल्हा परिषदेत आजही पंचायत विभाग,महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्य.अधिकारी पद रिक्त आहे.सार्व.बांधकाम विभागाच्या रिक्त पदावर सेवानिवृत्तीला १ वर्ष शिल्लक असलेले अधिकारी पाठविण्यात आले.सीईओ यांना तर अद्यापही जिल्हा परिषद कळलेली नाही.पोलीस अधीक्षक एैकत नाही.आरटीओ,वन्यजीव विभागाचे उपसंचालक,वैद्यकीय अधिकारी आदी पदे अद्यापही रिक्त आहेत.परंतु पदे भरतांना आपल्या जिल्ह्यात येणारा अधिकारी दमाचा असावा जेणेकरून विकासकामात त्यांचे वय आडवे येणार नाही याचा विचार न करता राज्यामध्ये जे काही अधिकारी सेवानिवृत्तीवर येऊन थांबले आणि काहींना कारवाई म्हणून पाठवायचेच तर गोंदियात पाठवा हा उद्दात हेतू सध्याच्या सरकारने घेतल्याने या सरकारमध्येच पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला न्याय देण्यात अपयशी ठरले आहेत.