सालेकसा,सडक अर्जुनीला बसस्थानकाची प्रतीक्षा,तर गोरेगाव,आमगावची दैनावस्था

0
30

गोंदिया,दि .१६- सर्वसामान्यांची लोकवाहिनी म्हणून नावलौकिक असलेल्या एसटीचे राज्यात सर्वदूर जाळे पसरले आहे. ङ्कबहुजन हिताय, बहुजन सुखायङ्क हे ब्रीद घेऊन प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी अत्यंत सावध आणि सुखकरपणे पोचविण्यात एसटीला पर्याय नाही. आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात आज एसटीने कात टाकलेली दिसत आहे. प्रवाशांची दर्जेदार सुखसोई मिळाव्या, यासाठी विभागाकडूनही सातत्याने प्रयत्न होत आहेत. राज्यात असे सुंदर चित्र असताना गोंदिया जिल्ह्यात मात्र आजही एसटीच्या नावाने बोंबा मारल्या जात आहेत. जिल्ह्यातील काही तालुकास्थळी अद्यापही बसस्थानक नाहीत. अनेक ठिकाणी तर निर्माणाधीन बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. बèयाच गावांना अद्यापही एसटीचे साधे दर्शनही झाले नाही. विशेष म्हणजे गोंदियाच्या जिल्हा मुख्य मध्यवर्ती बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थाच लुळीपांगळी आहे. सालेकसा व सडक अर्जुनीला अद्यापही बसस्थानक नाही.तर गोरेगाव व आमगाव बसस्थानकाकडे प्रवाशांनीच पाठ फिरविल्याने दुरावस्था झाली आहे.आजही जिल्ह्यातील अनेक गावात एसटी पोचलेली नाही.
मध्यवर्ती बसस्थानकासाठी भव्य इमारत बांधण्यात आली. वेतनभोगी कर्मचारीदेखील आहेत. प्रवासी बसने प्रवास करण्यासाठी येथे येतात. परंतु, त्या प्रवाशांच्या सुरक्षेचे कसलेही उपाय येथे करण्यात आले नाही. परिणामी, खिसेकापूपासून तर टवाळखोरांची संख्या येथे प्रचंड वाढली आहे. महिला प्रवाशांच्या छेडछाडीचे प्रकार हे नेहमीचे झाले आहेत.
गोंदियास्थित आगारातून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद, यवतमाळ, माहूर,बुलढाणा,अहेरी,रायपूर,नांदेड, नागपूरसह इतर जिल्ह्यात लांबपल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. गोंदिया आगारात आजघडीला ९५ बसेस आहेत. येथील मध्यवर्ती बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी फलाट तयार करण्यात आलेत. दिवसाकाठी जवळपास ४७५ फेèया सोडण्यात येतात. एसटी आगारात पोलीस विभागाची चौकी स्थापन करण्यात आली. परंतु, त्या चौकीत पोलीस नसतो.प्रवाशांचे साहित्य लांबविणे, महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविणाèयांना संधी मिळते.ऑटोरिक्षा चालकांनी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच आपला अड्डा जमविल्याने कधी आगारात प्रवेशाच्यावेळी अडचणी निर्माण होतात. गोंदिया जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मानला जातो. परिणामी, या बसस्थानकावरील सुरक्षेचे ढिसाळ नियोजन असामाजिक तत्त्वांना एक प्रकारे खुली छूट देते, असे म्हणणे अतिशोयक्ती ठरू नये.
आगाराच्या दर्शनी भागाला खासगी वाहनांनी विळखा घातल्याचे नेहमीच चित्र असते. आगार व्यवस्थापकाने पोलिसांना खासगी वाहनांवर कारवाई करण्याकरिता अनेकदा विनंती केली. परंतु, पोलीस यंत्रणेने त्यांच्या विनंतीला नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या. एसटीच्या उत्पन्नाला अवैध प्रवासी वाहतुकीमुळे खरा फटका बसतो. पोलीस विभागाच्या असहकार्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला चांगले दिवस आले असले तरी अनेक प्रवाशांना मात्र नाहक आपले प्राण गमवावे लागले. या अवैध वाहतूक करणाèया वाहनांच्या गतीला आणि प्रवासी संख्येला पोलीस कधीही लगाम लावताना दिसत नाही.
देवरी, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, आमगाव आणि सालेकसा याचबरोबर पोलिसांचे मुख्यालय असलेल्या गोंदियातदेखील काळीपिवळीचा धंदा जोमात आहे. चक्क वाहतूक नियंत्रण विभागाच्या नाकावर टिच्चून त्यांच्याच मुख्यालयासमोरून या अवैध प्रवासीवाहनांचा अड्डा आहे. या प्रकारावर अंकुश लावण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र, पोलिसांच्या लाभतंत्रामुळे नागरिकांचा आवाज म्हणजे ङ्कभैंस के सामने बिनङ्क सारखा आहे.
‘गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे बस सेवाङ्क असे शासनाचे धोरण असले तरी आजही जिल्ह्यातील तालुक्याच्या मुख्यालयी बसस्थानकच नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. एसटी महामंडळाच्या नियमाप्रमाणे तालुक्याच्या मुख्यालयी बसस्थानक असणे गरजेचे आहे. मात्र तिरोडा, गोंदिया, देवरी, आमगाव वगळता इतर तालुक्यात बसस्थानकाची निर्मितीच केलेली नाही. तर जुन्या प्रवासी निवाèयावरच आजही प्रवाशांना आपली वेळ काढून घ्यावी लागते.
जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त व आदिवासीबहूल क्षेत्र असलेल्या सालेकसा येथे वीस वर्षापेक्षा जास्त काळ लोटूनही बसस्थानकाचा नावपत्ताच नाही. तत्कालीन आमदार रामरतन राऊत यांनी त्यावेळच्या तहसीलदारांकडे बसस्थानकासाठी जागा देण्याची मागणी केली होती. महामंडळाचे विभागीय अभियंता स्थापत्य, विभागीय वाहतूक अधिकारी यांनी सालेकसा जवळील आमगाव खुर्द येथे बसस्थानकाकरिता जागेची पाहणी केल्याची माहिती आहे. तर हीच अवस्था सडक अर्जुनी येथील बसस्थानकाची आहे. या ठिकाणी सुद्धा अद्यापही बसस्थानक निर्माण नाही. बसस्थानकाच्या नावावर येथे जुना तुटका प्रवासी निवारा असून नवीन फलक लावण्यात आलेला आहे.
या तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने या तालुक्याला महत्त्व आहे. या ठिकाणावरून नागपूर, देवरी, अर्जुनी मोर, गोंदिया यामार्गावरील दररोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. मात्र, मोडक्या प्रवासी निवाèयामुळे प्रवाशांना खासगी दुकान qकवा पानटपèयांचाच आसरा घ्यावा लागतो.
गोरेगाव येथील बसस्थानकाची इमारत निर्माण होऊन तीन वर्षाचा कालावधी लोटत असून, अद्याप या बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले नाही. त्यामुळे या बसस्थानकात जलद बसेस तर दूर साध्या लोकल बसेसही जात नाही. तर फक्त विद्याथ्र्यांच्या पास तयार करण्यासाठी कर्मचाèयांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्जुनी-मोर येथे खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले.परंतु पहिल्या दिवशी सोडलेली शेगाव बस काही दिवसातच बंद पडली.
आमगाव येथील बसस्थानक शहरापासून चांगलेच लांब असल्याने त्या ठिकाणी प्रवासी थांबतच नाहीत. तर शहराच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातच एसटी बसची प्रतीक्षा करताना दिसतात. देवरीचीही अशीच काहीशी परिस्थिती असून येथेही प्रवासी आमगाव रोड चौकातच बसलेले दिसतात. या दोन्ही तालुक्याची अशी अवस्था असली तरी ज्या ठिकाणी बसस्थानक आहे. तिथे स्वच्छता नाही.