एडीएचओ गहलोतच्या निषेधार्थ कर्मचार्यांची घोषणाबाजी

0
5

गोंदिया-दि.17-जिल्हा परिषदेत सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी  डाॅ.गहलोत यांनी आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक आर.एम.भोयर यांना माहिती न दाखविल्या जाळून टाकण्याची भाषा वापरल्याच्या कारणावरुन आज गुरुवारला जिल्हापरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर जिल्हा  परिषद कर्मचारी महासंघ,महाराष्ट्र जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना आणि इतर संघटनानी मिळून निषेध सभा घेऊन निषेध नोंदविला.तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांना निवेदन दिले.यावेळी पुन्हा अशी घटना होऊ नये याबद्ददल सदर अधिकारीला बजावण्यात येईल असे आश्वासन गावडे यांनी कर्मचारी महासंघाला दिले.याचवेळी वित्त विभागाचे लेखाधिकारी जंवजाळ यांच्या कार्यप्रणालीमूळे गेल्या तीन चार महिन्यापासून आरोग्य विभागातील कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे वेतनाचे देयके न निघाल्याचे सीईओ गावडे यांना सांगण्यात आले.जवंजाळ नियमाचे कारण पुढे करुन आपली जबाबदारी झटकत असल्याने वित्त विभागाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने त्यांनाही ताकीद देण्याची मागणी केली.गावडे यांनी जंवजाळ यांच्या तक्रारी असल्याचे मान्यही केलेल.

संदर्भात भोयर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाकडे रितसर तक्रार नोंदविली आहे.मुल्ला आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी श्रीमती लांडगे या गेल्या अनेक वषार्पासून तिथेच असून त्यांच्या पासून अनेकांना त्रास झालेला आहे.रात्रीला रुग्णालयात न राहता देवरीला राहतात यामुळे त्यांची बदली होऊ शकते अशी विचारणा काही सामाजिक कार्यकत्यार्नी केली.त्यावर डाॅ.गहलोत यांनी यांंसदर्भात भोयर यांना माहिती विचारली तेव्हा भोयरने बदलीचे अधिकार उपसंचालकाकडे आहेत असे सांगितले.तसेच आपसी बदलीचे काय अशी माहीती विचारत माहिती न दिल्यास जाळून टाकीन अशी धमकीच गहलोत यांनी दिल्याचे भोयर यांनी महासंघ व सीईओा दिलेल्या तक्रारीत म्हटल्याने हे आंदोलन करण्यात आले.

या निषेध सभेत महासंघाचे अजय खरवडे,इंजि.वासुदेव रामटेटकर,अर्चना आयचित,मनोज मानकर एस.आर.काळे,लोहबरे, यांच्यासह महाराष्ट्र जिल्हा परिषद लिपीक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष खत्री,संतोष तोमर,सौरभ अग्रवाल,एम.आर.मिश्रा,तेजस्विनी चेटूले,वनिता दखने,स्नेहल वाटकर,जी.एस.पवार,शंकर पारधी,कटकवार,विनोद चौधरी,एस.डी.तुरकर,कृषी विभागाचे निमजे,वैशाली खोब्रागडे,व्ही.जे.मडावी,ओ.जे.बिसेन,कोहळे,देशभ्रतार,बावनकर,पडस्कर यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्वच कर्मचारी सहभागी झाले होते.