लाठीमार प्रकरणाचा युवा स्वाभिमानतर्पेâ निषेध 

0
6
गोंदिया : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्यभरातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी बुधवारी विधानभवनावर मोर्चा काढला. दरम्यान मोर्चा आवळण्यासाठी पोलिसांनी मोर्चेकरी संगणक परिचालकांवर अमानुष लाठीमार केला. या घटनेत अनेक तरूण जखमी झाले. गोंदिया जिल्ह्यातील जयदेव सरकार आणि जितेंद्र साखरे हे देखील जखमी झाले. हक्कासाठी लढणाNया संगणक परिचालकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमार प्रकरणाचा युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी संघटनेच्या वतीने निषेध नोंदविला आहे. शासनाने त्यांना नियमीत करावे, अशी मागणी त्यांनी प्रसिद्धी  पत्रकातून केली आहे. राज्यातील जवळपास २० हजार संगणक परिचालक या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांच्या अधिकाराचे शासनाने हनन करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही राणे यांनी लावला आहे.