आदिवासी विकास उपायुक्त डाॅ.खोडे व प्रकल्प अधिकारी सरोदेंनी फासले राजशिष्टाराला हरताळ

0
13

गोंदिया, दि.१९ : आदिवासी विकास विभागाच्यावतीने आज देवरी तालुक्यातील बोरगाव बाजार येथे एकलव्य निवासी पब्लिक स्कूलच्या इमारतीचे भूमीपुजन आदिवासी विकासमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.परंतु या कार्यक्रमाचे नियोजन करतांना आदिवासी विकास विभागाने प्रोटोकाल म्हणजे राजशिष्टाचाराची पुर्णत वाट लावली आहे.जिल्ह्यातील राज्यसभेचे खासदार ,विधानपरिषदेचे आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षासह स्थानिक मतदारसंघाच्या आमदारासोबतच खासदाराला आमत्रंण देणे अगत्याचे असते.परंतु आदिवासी विकास विभाग नागपूरच्या अप्पर आयुक्त डाॅ.माधवी खोडे व देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी गिरिष सरोदे यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवत हा कार्यक्रम पु्र्ण घडवून आणला.या स्कुलच्या भूमिपुजनासाठी तयार करण्यात आलेल्या कोनशिलेवर आदिवासी विकास मंत्री,पालकमंत्री व स्थानिक मतदारसंघाचे खासदार व आमदाराशिवाय दुसरे कुणाचेच नाव नव्हते.पुर्णत भाजप लोकप्रतिनिधींचे नाव देत राष्ट्रवादीच्या खासदार व आमदारासोबतच काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षा ज्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे त्यांना डावलण्याचा षडयंत्र या दोन्ही अधिकार्यानी केल्याचे उघड झाले आहे.राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल हे गोंदिया जिल्ह्याचे रहिवासी आणि राज्यसभेचे खासदार असल्याने ते येवो की न येवो त्यांचे नाव शिष्टाचारानुसार राहणे आवश्यक आहे.तसेच विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र जैन हे गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत.त्यामुळे त्यांचेही नाव असायला हवे होते.तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा मेंढे यांना आधीच राज्यमंत्र्याचा दर्जा असल्याने त्यांनाही बोलावणे व त्यांचे नाव पत्रिकेसह कोनशिलेवर असायला हवे होते.परंतु या तिघांनाही डावलून भाजपने आपल्या घाणेरड्या राजकारणास सुरवात केल्याची चर्चा आहे.स्थानिक अधिकारी गिरिष सरोदे व उपायुक्त खोडे यांच्या या गैरप्रकाराची इमानदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दखल घेऊन कारवाई करतात की त्यांच्या कृत्याला पाठिबां देत पक्षनिष्ठा जपतात यावर लक्ष लागले आहे.