लोकोपयोगी ६५ मॉडेल्स सादर

0
15

गोरेगाव : पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने एमआय पटेल हायस्कूल सोनी येथे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याचा समारोप मंगळवारी करण्यात आला. या प्रदर्शनीत तालुक्यातील ६५ विज्ञानाचे नमुने (मॉडेल) ठेवण्यात आले होते.
प्रदर्शनाचे उद््घाटन जि.प. सभापती (शिक्षण व आरोग्य) पी.जी. कटरे यांच्या अध्यक्षतेत आ.विजय रहांगडाले यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.हरिहरभाई पटेल, माजी जि.प. अध्यक्ष के.आर.शेंडे, गटशिक्षणाधिकारी वाय.पी.कावळे, गटसमन्वयक टी.बी. भेंडारकर, प्राचार्य व्ही.टी. पटले उपस्थित होते.
याप्रसंगी आ.विजय रहांगडाले यांनी विज्ञान प्रदर्शनीतून सध्याच्या जीवंत समस्यांवर उपयोगी व लोकोपयोगी प्रयोग सादर केले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. पी.जी.कटरे यांनी आजच्या काळात विज्ञानाचे योगदान अतिशय महत्वाचे असल्याचे मत विषद केले. प्रदर्शनीचे परीक्षण जगत महाविद्यालय गोरेगावचे प्रा.बी.बी.परशुरामकर, प्रा. एस. टी. नंदेश्‍वर, शहिद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल गोरेगावचे प्राचार्य आकरे यांनी केले.
प्रदर्शनीत क्रमांक पटकविणार्‍या विद्यार्थ्यांना पं.स. सभापती दिलीप चौधरी यांच्या अध्यक्षतेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल शेंडे, पं.स.सदस्या राणी रहांगडाले, सरपंच उषा वलथरे, तंमुस अध्यक्ष चंद्रकला पटले व पोलीस पाटील आशा बोपचे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
प्राथमिक गटातून एमआय पटेल हायस्कूल सोनी येथील कुणाल डिलीराम पटले प्रथम, मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव येथील सादगी रामप्रकाश चौधरी द्वितीय तर जि.प. शाळा बाम्हणी येथील गौरी वामेश्‍वर कटरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटातून एमआय पटेल हायस्कूल सोनी येथील दिक्षा अशोक भगत, किरसान मिशन गोरेगाव येथील प्रलय मधुकर बागडे व शहिद जान्या तिम्या जि.प. हायस्कूल गोरेगाव येथील मोहीत भोजराज दमाहे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले.
यशस्वीतेकरिता गटसाधन केंद्र गोरेगाव येथील विषयतज्ञ बी. बी. बहेकार, एस.बी.ठाकुर, एस. टी. बावनकर, जी.जी.ठाकरे, ओ. एस. ठाकरे, एस.डी.रहांगडाले, एमआय पटेल हायस्कूल सोनी येथील शिक्षक व कर्मचार्‍यांनी सहकार्यकेले. संचालन एस.एस.शहारे व आभार कावळे यांनी मानले