सूर्याटोलात संत गाडगेबाबा पुण्यतिथी

0
5

गोंदिया : श्री संत गाडगे महाराज व तुकडोजी महाराज विश्‍वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सव संत गाडगेबाबा व श्री तुकडोजी महाराज प्रांगण सूर्याटोला येथे २९ रोजी व ३0 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद््घाटन न.प. सदस्य खालीदभाई पठाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी हभप एम.ए. ठाकूर, अतिथी म्हणून जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५वाजता ज्योत प्रज्वलन, ७ वाजता सामुदायिक प्रार्थना व हरिपाठ, ३0 डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शोभायात्रा, दुपारी १ वाजता गोपालकाला व प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.अध्यक्षस्थानी भाजपा शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय, प्रमुख अतिथी माजी जि.प. अध्यक्ष कृष्णकुमार शेंडे उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आ. हरिहरभाई पटेल, विठ्ठलकुमार मुंदडा, मुलचंद रहांगडाले, श्रीकांत क्षत्रिय, डॉ. हरिनारायण चौरसिया, डॉ. राधेश्याम अग्रवाल, विजयसिंह बैस, जयमाला क्षीरसागर, माधव रहांगडाले, बुधराम काडे, नवीन कटरे, ताराचंद लांजेवार, केवलचंद गौतम, शैलेंद्रसिंह चंदेल व इतर पदाधिकार्‍यांनी केले आहे.