एनएसयूआय ने जाळले दहशतवाद्यांचे पुतळे 

0
16
गोंदिया,दि.4- एनएसयुआईव्दारे पंजाब येथील पठाणकोटमध्ये झालेल्या हल्याच्या निषेध करीत आज सोमवारला शहरात मोर्चा काढून दहशतवाद्यांला उत्तर देण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याच्या घोषणा दिल्या.तसेच येथील गुरूनानक गेट समोर दहशतवाद्यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला. यादरम्यान एनएसयुआईचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोशनलाल बिट्टू, सचिव अभिषेकवर्धन सिंग, गोंदिया जिल्हाध्यक्ष संदिप रहांगडाले, महासचिव अभिलाश मोहंती, सचिव रशमा नाजनीन, रोहन रंगारी, पंकज पटले, पंकज अग्रवाल, अंकित बिसेन, यश चैरसीया, शानु बांडेपुचे, शहारूख शेख, जाकिर उलहसन, कुनाल बिटकर, भावेश कटरे, सीरीस खाफेकर, साहिल पारधी सहित अन्य कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.