सहायक पोलीस निरीक्षकाचा एसीबी पथकावर गोळीबार

0
10

नागपूर- दि.६-लाचखोर पोलीस निरीक्षकाने चक्क एसीबी पथकावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना नागपूरच्या पाचपावली परिसरात घडली.पाचपावली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे याचाविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका प्रकरणी लाच मागितल्याची तक्रार दाखल झाली. आज सकाळी एसीबी चे पथक गावंडेला अटक करण्यासाठी पाचपावली परिसरातील acb2त्याचा पोलीस क्वार्टर मध्ये आल्यावर  गावंडेने एसीबी पथकावर सर्विस रिव्हॉल्वर मधून गोळीबार केला.सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही.मनीष गावंडे हा दीड वर्षापासून पाचपावली पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होता. सहायक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे याला अटक केली असून पुढील तपास करीत आहे