काटोलमध्ये अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरी केली सिल

0
48

पॅरा वैद्यक परिषदचा अधिकृत पत्र : नागपुर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ही पहिली घटना
काटोल दि ७-नागपुर जिल्ह्यातील काटोल मध्ये अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरी चालविल्यामुळे प्रबंधक महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद मुंबई यांचे आदेशान्वये मेडीकल लेबॉरटरी टेक्नॉलॉजीस्ट असोशिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष संदिप झाडे यांच्या तक्रारीवरुन पोलीस निरिक्षक महादेव आचरेकर यांनी नगर परिषद शॉपींग सेंटर मधील साई क्लीनिकल लेबॉरटरी या अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरीचे संचालक मितेश कृष्णराव पोतदार यांची लॅब सिल करुन महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या कलम ३१(१),३२ या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे अवैद्यरित्या पॅरा वैद्यक व्यावसाय करणाय्रांचे चांगले धाबे दणाणले आहेत.
प्रबंधक, महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद मुंबई यांनी १७ मार्च २०२२ ला नागपुर जिल्ह्यांच्या काटोल येथील अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरी व पॅरा वैद्यक व्यावसायीक यांच्याकडे महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नसणाय्रांवर गुन्हे दाखल करण्याबाबत मेडीकल लेबॉरटरी टेक्नॉलॉजीस्ट असोशिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष संदिप झाडे यांना जा क्र मपवैप/मेलेटेअम/६६/२०२२ अन्वये पत्र पाठवलेला होता. त्या नुसार आज दि ७ एप्रिल २०२२ ला मेडीकल लेबॉरटरी टेक्नॉलॉजीस्ट असोशिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष संदिप झाडे हे काटोल पोलीस स्टेशन गाठुन पोलीस निरिक्षक महादेव आचरेकर यांना पॅरा वैद्यकिय परिषद चे अधिकृत पत्र दाखवुन दुपारपासुनच कारवाई ला सुरुवात केली होती. पोलीस निरिक्षक महादेव आचरेकर यांनी संपुर्ण लेबॉरटरी सिल करुन संपुर्ण साहित्य जप्त केले आहे. महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद कायदा २०११ च्या कलम ३१(१), ३२ अन्वये गुन्हा दाखल झाल्याने महाराष्ट्रातील हा पहिला गुन्हा दाखल झाला असुन या कारवाईने बोगस लॅब धारक चांगलेच धास्तावले आहेत.
कारवाई दरम्यान संघटनेचे सचिव श्री दिपक चंदनखेडे,सदस्य जयदीप गजभिये, सौ. चैताली गेडाम व अनिल वैद्य उपस्थित होते