डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने मोटारसायकल रॅली

0
46

गोंदिया,दि.12ःपरमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने उद्या 13 एप्रिल रोजी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन भीमनगर मैदान येथून सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे.या भव्य मोटारसायकल रॅलीमध्ये बहुजन समाजातील बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतरत्न डा. बाबासाहब जयंती महोत्सवर समिती अध्यक्ष डा. राजेंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेत प्रशासकीय भवन परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 13 एप्रिलला सायंकाळी 6  वाजता भन्ते तिस्सवंस यांच्या हस्ते उद्घाटन तथा राज्यसभा खासदार प्रा. मनोज कुमार झा व प्रा. सुधिर मस्के (दिल्ली विश्वविद्यालय) मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.डाँ. प्रशांत मेश्राम, डाँ.घनश्याम तुरकर, डँा वज्रा पुष्पराज गिरी, एड. सचिन बोरकर (नागपुर हायकोर्ट), डाँ. अनुराग बाहेकर, एड. अभिनव गुजर (नागपुर हायकोर्ट) उपस्थित राहणार आहेत. रात्रीला  8 वाजता सारंग म्युजिकल ग्रुप द्वारा बुध्द-भिम गित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार 14 एप्रिलला सकाळी 7 वाजता डाँ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस माल्यार्पण, 11 वाजता प्रबोधनात्मक भीम-बुध्द गीत कार्यक्रम व दुपारी 1 वाजता भन्ते श्रध्दाबोधी, बसपा जिलाध्यक्ष दिनेशसिंह गेडाम, वंचित बहुजन आघाडी जिलाध्यक्ष सतिश बन्सोड, बीआरएसपी प्रदेश सचिव डी. एस. मेश्राम,माजी नगरसेवक सुनील भालेराव, घनश्याम पानतावने, विनीत सहारे, दिपीका रूसे, ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांच्या उपस्थितीत मुख्य अभिवादन कार्यक्रम होणार आहे.