डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचा समारोप

0
23
वाशिम,दि.१६ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त ६ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान आयोजित सामाजिक समता कार्यक्रमाचा समारोप आज १६ एप्रिल रोजी करण्यात आला.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर वाहणे,प्रा.डॉ.संजय सावळीकर, अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ.रामकृष्ण कालापाड,अंनिसचे कार्याध्यक्ष पी.एस.खंदारे,सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती पेंढारकर, व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती.
      श्री.खडसे यावेळी म्हणाले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे.अनेकांनी ते प्रेरणादायी व दीपस्तंभ आहे. डॉ.आंबेडकर यांनी आंतरराष्ट्रीय संबंध,जलनीती, शिक्षण, शेती,पत्रकारिता यासह अनेक विषयांवर विस्तृत लेखन केले.माणूस हा केंद्रबिंदु मानून त्याच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले.वंचीत, शोषित, पीडित, मागास व महिलांच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्यभर काम केल्याचे त्यांनी सांगितले.
         महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे सांगून श्री.खडसे म्हणाले, देशपातळीवर महाराष्ट्राची ओळख ही संत व समाजसुधारकांची भूमी म्हणुन आहे.समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात.मागासवर्ग,अनु.जाती व नवबौद्ध वर्गातील वंचित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे श्री.खडसे यांनी सांगितले.
         श्रीमती पेंढारकर म्हणाल्या, महिलांसाठी विविध योजना आहेत.त्याची माहिती करून घ्यावी.महिला,मुलींनी कायदेविषयक बाबींची माहिती घ्यावी.सामाजिक समता कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयांवर व्याख्याने,मार्गदर्शन आयोजित करण्यात आली होती. यांचा लाभ निश्चितच तळागाळातील लोकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
               श्री.कालापाड म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा वाचन करावेत.क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोळ्यांसमोर ठेवावेत.वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी संविधान समजून घेतले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          श्री.खंदारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वव्यापी विचार समाजात रूजवण्याचे कार्यरत सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून होत आहे.यावेळी त्यांनी कवितेच्या ओळीतून बाबासाहेबांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.
         कु.सत्यप्रिया शृंगारे हिने बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
          डॉ.सावळीकर म्हणाले, बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहचविण्याचे काम समाजकल्याण विभागाच्यावतीने सामाजिक समता सप्ताहानिमित्त होत आहे. हा सप्ताह म्हणजे सामाजिक सणच असून बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक होण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल चोंडकर,विजय भगत,गोविंद उगले, श्रीमती आर.एन.साठे, एस.एम.निमन तसेच समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी, ब्रिक्स इंडिया प्रा.लि.चे जिल्हा व्यवस्थापक अनिल गायकवाड यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, समाज कल्याण विभागाचे कर्मचारी तसेच नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
        यावेळी पुरूषोत्तमबाबा व्यसनमुक्ती कलासंचाचे कलावंत के.के.डाखोरे व त्यांच्या सहका-यांनी रमाई गीत ,भीमगीत,संत गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन सादर केले.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.वाठ यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर कव्हर यांनी केले.उपस्थितांचे आभार बार्टीचे प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे यांनी मानले.